माझ्या घर आणि तिचे घर अगदी समोरा-समोर. माझ्या घराचा दरवाजा उघडला की, ती दिसायची अन् तिने खिडकी उघडली की, मी दिसायचे.
ती सुंदर दिसायची, तिचे घारे डोळे, लांब केसामुळे तिचे सौंदर्य नेहमीच खुलत जायचे, सतत तिला पाहिल्याने मला ती खूप आवडायची, समोरा-समोर असल्याने, कुणाला शंका येण्याचेही कारण नव्हते, तिने ही माझ्या प्रेमाला होकार दिला... अन् आमचे प्रेम जमले, ती घरच्यांना घाबरायची... तरीसुद्धा तिने एक चिठ्ठी लिहून प्रेम असल्याचे कळवले.पण हे जास्त दिवस टिकले नाही... बहुतेक घरच्यांना ही प्रेमाची भाषा कळाली... अन् त्यांनी घर तर हलवलेच नाही तिचे लग्नही केले.
या प्रेम कहाणीला पंधरा वर्षांचा अवधी गेल्यानंतर ती मला पुन्हा दिसली, तेच घारे डोळे, लांब केस, डोळ्यांवर आलेल्या केसाने पूर्वीपेक्षाही सुंदर दिसत होती, तिला पाहताच पंधरा वर्षापूर्वीचे प्रेम डोळ्यांसमोर उभे राहिले, ती आणि तिच्या सोबतचे लहान मूल रिक्षात होते, मी रिक्षाच्या
मागे गेलो, पण मला तिने पाहिलेही नाही... मी तिला त्यावेळी शोधण्याचा खूप प्रयत्न केला. पण मला ती सापडलीच नाही, त्यात माझा काहीच दोष नव्हता, पण तिचा मात्र माझ्याबद्दल मोठा गैरसमज झाला असावा, तिला घेवून जाणारा रिक्षा... दिसेनासा होईपर्यंत मी पहातच राहिलो... आणि
तू भेटशील तेव्हा, खूप काही बोलायचे आहे
थोडे भांडण आणि खूपसे प्रेम करायचे आहे
आतापर्यंतच्या विरहाचा जाब तुला विचारायचा आहे
.. पण हे सारे तू भेटशील तेव्हाच
पुन्हा दिसलीस तर निदान मागे वळून तरी पहा ना !