Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कॉलेजियन्सची Exam!!!

- पूजा तावरे

कॉलेजियन्सची Exam!!!
WD
शाळेतली समीकरणं सुटता सुटता पावलं बाहेर पडतात. . . .अन्‌ आयुष्यात एक नवं वळण येतं ते कॉलेज विश्वाचं. मग काय कॉलेज मध्ये प्रवेश घेणार म्हटलं की तरूणांचा उत्साह अर्वणनीय असतो. कॉलेज म्हणजे करिअर, स्वची ओळख, कलागुण आणि मनात होणारी नकळत हुरहुर अशान सळसळत्या तरूणाईचे दिवस. पण याही पेक्षा कट्टा, कँटीन,कॅम्पस, फ्रेंडस्‌ अशा गोष्टींमध्येच मन गुंतून जाते. मात्र या सगळ्या मध्ये कॉलेजियन्सला एका गोष्टीचे भान मात्र कधीच नसते. ती म्हणजे......कॉलेजची परिक्षा. कॉलेज मध्ये आपल्याला डिग्री मिळवण्यासाठी परिक्षा नावाची गोष्ट असते हे कॉलेजियन्सच्या खिजगणतीतही नसतं.

परिक्षांचा काळ सुरू झाला की कॉलेजियन्स मध्ये एकच धमाल उडते. कॉलेजमध्ये परिक्षा महत्त्वाची असोत वा नसो टेन्शन हे प्रत्येकालाच येतं. कॉलेजमधले स्कॉलर, पुस्तकीकिडे मात्र परिक्षेच्या महिनाआधी पासूनच जोरदार तयारी करत असतात. बर्‍याच मंडळींना तर आपला रोल नंबर काय आहे? आपले विषय काणते आहेत? इथपासून सुरूवात असते. एरवी कॉलेजच्या कॅम्पसमध्ये चकाट्या पिटत बसलेली रिकामटेकडी मंडळी परिक्षा जवळ आली की नोटस्‌ जमा करणं, असाइन्मेंट पूर्ण करणं, फायली, जनरल्स, प्रोजेक्ट पूर्ण करण्याचं काम युध्द पातळीवर सुरू असतं. हळूहळू कॉलेजच्या वातावरणात एक्झाम फिव्हर वाढू लागतो. मग काय कॉलेज कॅम्पस, कट्टे, मैदान, पार्कींग अशा नेहमी गजबजणार्‍या जागा ओस पडू लागतात. सारं काही सुनंसुनं भासू लागतं. आणि
webdunia
ND
एरवी ओस पडलेल्या लायब्ररीत हाऊसफुल्ल चे बोर्ड दिसू लागतात. वर्गातले स्कॉलर, पुस्तकी किडे वगळता इतर विद्यार्थ्यांची दशा खूपच वाईट असते. झेरॉक्सच्या दुकानात रांगा वाडायला लागतात. दिवसभर नोटस्‌ मिळवून होईपर्यंत कधी संध्याकाळ होते हे कळत नाही आणि मग आज नाईट मारावी लागणार असं ठरवलं जातं. अभ्यासासाठी होणारे हे नाईटआऊटस्‌ म्हणजे वेगळचं वातावरण असतं. कधी कधी तर अभ्यास राहतो बाजूला आणि रात्रभर मित्रांसोबत गप्पा होतात. परिक्षेच्या अभ्यासासाठी मित्रांच्या घरी रात्री जागून कधी डुलक्या खात तर कधी गप्पा मारत अभ्यास केला जातो. मग फोन, फेसबुक, ऑर्कुटवर अपडेट होणारं एक्झामचं स्टेटस्‌, पेपरच्या आदल्या रात्री फोनवर होणार चर्चा, मोजकेच प्रश्न करून जायचं की सगळं वाचत बसायचं? काय वाचू ? काय नको? इतकं सगळं एका रात्रीत कसं काय होणार? परिक्षेला काय येईल? मग आपलं काय होईल अशी काळजी करत अभ्यास होत असतो. हातात पेपर पडेपर्यंत मनातली हुरहुर कायम असते पण या सगळ्या वातावरणाची मजा काही औरच असते. नोटस्‌ लिहून लिहून हात दुखतो, वाचून वाचून डोळे दुखतात, पुस्तकं नोटस्‌ डोळ्यांसमोर धरल्या की कशी कोणास ठाऊक पण झोप यायला लागते. मग वर्षभर केलेला टाईमपास, मस्ती हे सगळं चित्र डोळ्यासमोर फिरू लागतं. आणि मग अरे यार पूर्वीपासूनच अभ्यास केला असता तर ....अस वाटण्यापर्यंत मजल जाते.

अभ्यास सुरू झाला की एकमेकांना SMS करणं,मग तुझं किती झालं, माझं एवढं झालं, जाम टेन्शन आलय . . . .असं रात्रभर जागरणं करून मला तर केटी लागणार यार असा विचार येतो. डोळ्यांसमोर Books आणि डोक्यात वेगळेच Looks अशी परिस्थिती दिसते. नोटस्‌ लिहून लिहून हात दुखतो, वाचून वाचून डोळे दुखतात. मग वर्षभर बंक केलेले क्लास, टाइमपास, अभ्यासेत्तर गोष्टी. . . .आठवू लागतात.

webdunia
ND
धडे ऑप्टशनला टाकत टाकत एकदाचा अभ्यास करून परिक्षेला सामोरं जायची तयारी होते कट्ट्यांवर, पायर्‍यांवर पुस्तकात असलेली डोकी दिसतात. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत पुस्तकात डोकी असतात. आणि तेवढ्यात घंटा होते. ..परिक्षा हॉलचं वातावरणही मजेशीर असतं. मग प्रत्येकाला शेवटच्या क्षणापर्यंत बेस्ट ऑफ लक म्हणत म्हणत परिक्षा हॉलमध्ये प्रवेश केला जातो. कुणी डोळे मिटून प्रार्थना करत असतं, तर कुणी कधी एकदाचा पेपर येतो. उत्तरपत्रिकेवर श्री, श्री गणेशा लिहून आरंभ होतो. मग पेपर कसा असेन, मी केलेलं येईन की भलतचं पडेल. असे प्रश्न पडायला सुरूवात होते. पेपर मिळाल्यावर कुणी आत्मविश्वासाने पेपर लिहायला सुरूवात करतात, तर कुणी तीन तासांचे वेळापत्रकच मांडून बसतात. पेपर हातात पडल्यावर छ्या काय पेपर सेट केला आहे, बरेच प्रश्न आऊट ऑफ सिलॅबसच आहेत, अरे हा पश्न तर सकाळीच वाचला होता अशी कूजबूज सुरू होते. उत्तरपत्रिकेवर श्री, श्री गणेशा लिहून आरंभ होतो.

काही स्कॉलर २-२ सप्लीमेंट लावून पेपर लिहित असतात.तर काही जण रमत गमत पेपर लिहित असतात. पहिले अर्धा तास सगळेच जण एकदम सिन्सिअरली पेपर लिहतात. पण नंतर मात्र परिक्षा हॉल मधला टाइमपास सुरू होतो. यामध्ये परिक्षा हॉल मध्ये बाकीचे कसे पेपर लिहण्यात मग्र आहेत हे पाहणं, पेनांसोबत खेळणं, खिडकीतून बाहेर पाहणं....असा टाइमपास करत करत वेळ निघून जातो आणि वॉर्निंग बेल होते. ..... आणि पहिला पेपर संपून दुसर्‍या पेपरच्या नोटस्‌ गोळा करायची तयारी होते. खरचं कॉलेजच्या परिक्षेचे क्षण खूपच गमतीदार असतात...प्रत्येकजण असाच विचार करत असेल ना की I want to live these moments fullest.

Share this Story:

Follow Webdunia marathi