Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कथानक : कोणी घर देता का घर

कथानक : कोणी घर देता का घर

वेबदुनिया

, बुधवार, 8 मे 2013 (16:55 IST)
कलाकार : भरत जाधव, क्रांती रेडकर, विजू खोटे, कुलदिप पवार, विजय चव्हाण, रीमा लागू, दीपक शिरके, जयवंत वडकर, कमलाकर सातपुते, दिगंबर नाईक, सविता माल्पेकर, किशोर प्रधान, शोभा प्रधान, वर्षा तांडले, शुभांगी लटकर, विमल म्हत्रे, सुहास पालिशकर, छाया कदम, शैलेश पितांबरे.
दिग्दर्शक, लेखक, कथानक, गीतकार : राजेश देशपांडे
निर्माता : हेमंत बंगेरा
सहनिर्माता : शीला मंगेश जगताप
संगीत : रोहन प्रधान
रीलिज डेट : 14th June 2013

PR

हे चित्रपट कुणाल व नताशाच्या प्रेमकथेवर चित्रवण्यात आले असून, कुणाल व नताशाच्या आई वडिलांच्या आपसातील दुश्नमीवर आधारित आहे. कुणालची आई सरस्वती देसाई एक ज्वलंत पत्रकार वकील असते आणि नताशाचे वडील नरसिंहकोरडे पाटील हे एक राजकीय व्यक्ती असून एक बिल्डर असतात. जेव्हा नरसिंह गृह मंत्रीच्या पदावर असतात तेव्हा त्यांनी केलेल्या एका बेकायदेशीर जागेच्या अतिक्रमणाबद्दल सरस्वती खुलासा करते, त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.
webdunia
PR

webdunia
PR


सरस्वती आपल्या मुलीसाठी वर शोधत असते व नरसिंह आपल्या मुलासाठी वधूचा शोध सुरू करत असताना त्यांना कुणाल व नताशाच्या प्रेम संबंधांबद्दल कळतं. कुणाल व नताशा आलेल्या परिस्थितीला तोंड न देता पळून जाण्याचा निर्णय घेतात. अंतत: ते कुणालच्या एका मित्राकडे आश्रय घेतात. सरस्वती व नरसिंह तक्रार दाखल करण्यासाठी ठोकरे पोलिस स्टेशनमध्ये येतात, संयोगाने तो इंस्पेक्टर कुणालच्या मित्राचा भाऊ निघतो. तो त्या दोघांना रंगेहात पकडण्याचे आश्वासन देतो पण कुणाल व नताशा तेथून पळ काढण्यात यशस्वी ठरतात.

webdunia
PR

webdunia
PR


नंतर त्या दोघांना बर्‍याच विकट परिस्थितींना तोंड द्यावे लागते. कुणाल व नताशा एकत्र येतील का? त्यांचे परिजन त्यांना स्वीकारतील का? हे सर्व आपण पाहूया 'कोणी घर देता का घर' या चित्रपटात.

webdunia
PR

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi