Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

झाले मोकळे आकाशची ध्वनीफित प्रकाशित

झाले मोकळे आकाशची ध्वनीफित प्रकाशित

चंद्रकांत शिंदे

WD
बदलत्या काळात नात्याचे संदर्भ जरी बदलले तरी काही नाती मात्र सदैव साथ देत असतात. असेच एक नाते म्हणजे मातापिता आणि त्यांची मुले. त्यातही अपत्य दत्तक असेल तर त्या नात्याला एक वेगळे रूप मिळते. आईवडिलांचे आपल्या दत्तक मुलीशी असलेल्या नात्यावर आधारित झाले मोकळे आकाश या चित्रपटाचा ध्वनीफित प्रकाशन सोहळा नुकताच चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञांच्या उपस्थितीत मुंबईतील एका हॉटेलमध्ये संपन्ना झाला. सी.एस.फिल्मस बॅनरअंतर्गत तयार झालेला हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. राजेंद्र अनंत आणि योगेश महाजन यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

ज्येष्ठ कवी गीतकार गंगाधर महाम्बरे यांनी गीते लिहिली असून संगीतकार निर्मल कुमार यांनी या गीतांना मधुर चाली दिलेल्या आहेत. साधना सरगम, रविंद्र साठे, देवकी पंडीत, जयश्री शिवराम, वैशाली सामंत, अरुण इंगळे यांनी ही गीते गायली आहेत. चैताली व श्रृती या चित्रपटातील बालकलाकारांच्या हस्ते ध्वनीफित पकाशित करण्यात आली. या दोघींव्यतिरिक्त चित्रपटातील अन्य कलाकार आहेत सुबोध भावे, पल्लवी वैदय, दक्षा महेन्दु, स्वप्ना साने, चैत्रा राजेंद्र, सुवासिनी देशपツडे, रमेश भाटकर, लीना भागवत, शितल शुक्ल, निलेश सावे, शिवानी क-हाडकर आणि शरद पोंक्षे. चित्रपटाचे कार्यकारी निर्माता आहेत ज्ञानेश्वर ढोके.

Share this Story:

Follow Webdunia marathi