Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मराठी पडद्यावर 2013!

मराठी पडद्यावर 2013!

वेबदुनिया

मराठी सिनेमांचे विषय अनेकांच्या उत्सुकतेचे ठरले आहेत. नव्या दमाचे कलाकार, निर्माते, दिग्दर्शक यांनी 2013 दणातून सोडण्याचा जणू संकल्पन केल्याचे जाणवते. यात कुणाची चलती होईल, हे आगामी काळात दिसेलच, पण एवढं मात्र खरं की, मराठी सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांना थिएटर गाठावं लागेल तर आणि तरच मराठी सिनेमा ताठ मानेनं जगेल!

आजचा दिवस माझा (25 जानेवारी)
सचिन खेडेकर, महेश मांजरेकर ही जोडी पुन्हा या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांमसोमर येणार आहे. राजकारणातील भाबड्या आशेच्या कारकीर्दीवर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रकात कुलकर्णी यांनी केले आहे.

PR

प्रेमाची गोष्ट ( 1 फेब्रुवारी)

'मुंबई-पुणे-मुंबई' फेम दिग्दर्शक सतीश राजवाडे यांचा हा सहज, साधी, सोपी अशी 'प्रेमाची गोष्ट' सांगणारा चित्रपट आहे. अष्टपैलू अभिनेता अतुल कुलकर्णी आणि 'चक दे' फेम अभिनेत्री सागरिका घाटगे मुख्य भूमिकेत दिसतील. ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी बर्‍याच कालावधीनंतर पदार्पण करीत आहेत.

webdunia
PR

पावर
ळ असल्याच हीच सर्वसामान्य जनता राजकीय शक्तीला महागात पडू शकते, अशा आजच्या काळातील विषयावर आधारित 'पावर' चित्रपट आहे. डीआर-टू प्रॉडक्शन या बॅनरअंतर्गत निर्मित चित्रपटाचे दिग्दर्शन विजय राणे यांनी केले आहे. नागेश भोसले, विजय पाटकर, आनंद अभ्यंकर अशी तगडी स्टारकास्ट आहे.

webdunia
PR



शूर आम्ही सरदार

सण-उत्सवाची पर्वा न करता खाकी वर्दीतला पोलीस कुटुंबाचे सुख-दुख बाजूला सारून नागरिकांच्या संरक्षणासाठी झटत असतो. मात्र त्यांच्या समस्या ह्या नेहमी दुर्लक्षित राहिल्या आहेत. पोलिसांच्या विविध समस्यांवर आधारित हा चित्रपट आहे.

webdunia
PR

मा
'क्य कुल है हम' 'डॉन' या चित्रपटांद्वारे बॉलीवूडमध्ये अभिनयाचा ठसा उमटवणारी 'खल्लास गर्ल' ईशा कोप्पीकर या चित्रपटाद्वारे मराठीत पदार्पण करणार आहे. मनाली सावंत यांच्या 'सायली ड्रीम व्हेंचर्स' निर्मित चि‍त्रपटाचे दिग्दर्शक मनोहर सरवणकर आहेत.

webdunia
PR

दुनियादारी
तरुणाईचं विश्व अतिशय वास्तवरित्या मांडणारी सुहास शिरवळकर यांची 'दुनियादारी' ही कादंबरी आजही बेस्ट सेलर आहे. तीन दशकांनंतरही त्यातले संभर्द आजच्या पिढीला लागू पडतील असे आहेत. प्रसिद्ध कॅमेरामन संजय जाधव या कादंबरीच्या निमित्ताने निर्माता, दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांसमोर येत आहेत. अंकुश चौधरी, स्वप्निल जोशी, जितेंद्र जोशी उर्मिला कानेटकर, वर्षा उसगावकर यांच्या यात मुख्य भूमिका आहेत.
webdunia
PR

झपाटलेला
'ओम फट स्वाहा' हा महामृत्युंजय मंत्र म्हणत पुन्हा जीवनदान मिळवण्यासाठी धडपडणारा आणि त्यासाठी भोळ्याभाबड्या लक्षाला वेठीस धरणारा तात्या विंचू तब्बल 20 वर्षांनंतर पुन्हा खलनायकी खेळ‍ी खेळण्यास सज्ज झालाय. 1993 रोजी मराठी रूपेरी पडद्यावर झळकलेला आणि प्रचंड यश मिळवलेला 'झपाटलेला' या चित्रपटाचा हा थ्रीडी सिक्वल असून यात आदिनाथ कोठारे, सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर, मधु कांबीकर, राघवेंद्र कडकोळ, विजय चव्हाण, मकरंद अनासपुरे मुख्य भूमिकेत आहेत.

webdunia
PR

वारस एक इच्छ

एखाद्या स्त्रीला मूल होत नसेल तर वारस मिळावा या हट्टापोटी त्या स्त्रीला कशाप्रकारे नरकयातना भोगाव्या लागतात, याचे चित्रट नर्मदा फिल्म्सच्या या चित्रपटात करण्यात आले आहे. अमोल कोल्हे, कुलदीप पवार वर्षा उसगावकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक के. विलास असून निर्माते विश्वनाथ सपकाळे आहेत.

webdunia
PR

धर्मांत
राजकीय विषयाचा सूक्ष्म अभ्यास असणारा आणि विविध मानवी स्वभाव रेखाटणार्‍या व्यक्तीरेखा अशी वैशिष्ट्ये असणारा 'धर्मांतर' राजकीयपट आहे. 'ओम फिल्म्स' या बॅनरखाली उज्जवल ठेंगडी यांनी चित्रपटाची निर्मिती- दिग्दर्शन केले असून 90च्या दशकात त्यांनी दिग्दर्शित केलेल्या 'वजिर' चित्रपटाला विविध पुरस्कार मिळाले होते. डॉ विलास उजवणे, शरद पोंक्षे, स्मिता तांबे, अश्विनी एकबोटे, हेमांगी कवी यांच्या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.

webdunia
PR

टुरिंग टॉकीज

'हॅलो जय हिंद'च्या यशानंतर निर्माती अभिनेत्री तृप्ती भोईरने 'टुरिंग टॉकीज'मधून चित्रपटाची निर्मिती केली असून दिग्दर्शक गजेंद्र अहिरे करणार आहेत. तंबू थिएटर या महत्त्वाच्या या दुर्लक्षित विषयावरचे कथानक आहे.

webdunia
PR

वेलकम टु जंगल
गुरुमाऊली क्रिएशन्स निर्मित हा चित्रपट मराठीतला पहिला अ‍ॅडव्हेंचर सायन्स फिक्शन चित्रपट आहे. 'संभा'फेम नायक देवेंद्र यात मुख्य भूमिकेत असून त्याने चित्रपटात काही चित्तथरारक स्टंटस केले आहेत.

webdunia
PR

आजोबा

दिग्दर्शक सुजय डहाके पुन्हा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे. यावेळीही तो एक अतिशय वेगळा विषय घेऊन येत आहे. 'आजोबा' असे चित्रपटाचे नाव असून त्यात मुख्य भूमिकेत बिबट्या दिसणार आहे. या चित्रपटाद्वारे उर्मिला मातोंडकर मराठीत पदार्पण करेल.

webdunia
PR



वीर बाजीप्रभू देशपांड

व्हिज्युअलच्या माध्यमातून मराठी विराचा उलगडा जाणारा पहिलाच चित्रपट रूपेरी पडद्यावर रंगवला जाणार आहे. फेसबुकवर या सिनेमाच्या आगळ्या आणि आकर्षक पोस्टर्सने चांगलीच धूम केली आहे. चित्रपटाची निर्मिती सनद माने यांनी केली असून शैलेश निळे या तरुणाची ही संकल्पना आहे.

webdunia
PR

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi