Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘नजर’ 6 नोव्हेंबरला

‘नजर’ 6 नोव्हेंबरला
, सोमवार, 2 नोव्हेंबर 2015 (12:31 IST)
व्हिजन आर्टस्ची प्रस्तुती असलेला ‘नजर’ हा मराठी चित्रपट येत्या 6 नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. 
 
या सिनेमात प्रेक्षकांना स्त्रीप्रधान कथानकाबरोबरच प्रेमकथा पाहायला मिळेल. निर्माता अजय आर. गुप्ता, दिलीप वाघ आणि डॉ. हरी कोकरे यांनी ‘नजर’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. दिग्दर्शनाची धुरा गोरख जोगदंडे यांनी सांभाळली आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना 
 
अंतमरुख करायला लावणारी कथा पाहायला मिळेल असं दिग्दर्शक गोरख जोगदंडे यांचं म्हणणं आहे. 
 
या चित्रपटाबाबत विस्तृत माहिती देताना ते म्हणाले, भारतीय 
 
चित्रपटसृष्टीमध्ये पुरुषप्रधान चित्रपटांची संख्या खूप आहे. त्या तुलनेत स्त्रीप्रधान सिनेमांची संख्या नगण्य आहे. मराठीतही काहीसं असंच गणित आहे, त्यामुळे स्त्रीप्रधान चित्रपट बनवायचा विचार डोक्यात घोळत होता. त्यामुळे ही कथा सुचली. आज आपण आपला समाज सुधारला आहे असं म्हणतो, पण स्त्रियांवरील अन्याय कमी झाले का? हा प्रश्न आजही वादातीत आहे. 
 
दर सेकंदाला देशाच्या कुठल्या ना कुठल्या कोपर्‍यात एखादी अबला अन्यायाला बळी पडत असते. पण हीच अबला जर सबला झाली आणि तिने दुर्गेचं रूप धारण केलं तर काय घडू शकतं ते या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi