Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

डोळयात अंजन घालणारी आणि भरल्या आसवांना रिक्त करणारी कहाणी - “अ.ब.क”

डोळयात अंजन घालणारी आणि भरल्या आसवांना रिक्त करणारी कहाणी - “अ.ब.क”
समाज मनातील वास्तव आणि अंतरंगातील प्रतिबिंब व्यक्त करणारा, अ.ब.क. हा बहुचर्चित चित्रपट येत्या ८ जून पासून रसिकप्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
 
समाज मनातील वास्तव आणि अंतरंगातील प्रतिबिंब व्यक्त करणारा, अ.ब.क. हा बहुचर्चित चित्रपट येत्या ८ जून पासून रसिकप्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दोन अनदोन चिमुकल्या अनाथ जीवांची स्वप्नपूर्तीसाठी झालेली होरपळ आणि केलेली धडपड, त्याचीच हीकरूण कहाणी, डोळयात अंजन घालणारी आणि भरल्या आसवांना रिक्त करणारी ! अभिनेत्री तमन्ना भाटिया, सुनिल शेट्टी, रवि किशनहि त्रिसुत्री म्हणजे या चित्रपटास लाभलेली रूपेरी किनार! ग्रॅव्हीटी एंटरटेन्मेंट व व्हेंकीज प्रस्तूत व मिहीर सुधिर कुलकर्णी निर्मित अ.ब.क. हा चित्रपट सामाजिक विषयावर भाष्यकरीत असला तरी प्रबोधनाची बांधिलकीही स्विकारत आहे. अ.ब.क. ही कथा आहे. अनाथ हरी आणि जनी या दोन लहान जीवांची,हरीला आपली लहान बहिण जनीचं स्वप्न पूर्ण करायचंय; पण अडचणी आभाळा एवढ्या, पण मोठ्या जिद्दीने हरी संकटावर मात करतो,जिथे माणसाच्या  आयुष्याचा शेवट होतो, त्याच स्मशानात हरी आणि जनीच्या आयुष्याची सुरूवात होते आणि हरी समाजासमोर नवाआदर्श निर्माण करतो, अर्थातच त्याच्या वेदनादाई प्रवासाचे सहकारी कोण ? स्मशानाचं बदलतं रूप आणि हरीची कल्पकता प्रत्यक्षरुपेरी पडद्यावर पाहणे इष्ट ठरेल.
 
हिंदीतील आगाडीचे संगीतकार साजिद - वाजीद या जोडीने एक अप्रतीम गीत संगीतबद्ध केले आहे. अश्विनी शेंडे यांच्याअर्थपूर्ण गीतांना आदर्श शिंदे व अमृता फडणवीस यांचे पार्श्वगायन लाभले आहे. बापी टिटुल यांचे पार्श्वसंगीत, महेश अने यांचे छायांकन.  यामुळे चित्रपटाची उंची वाढली आहे. दिग्दर्शन रामकुमार गोरखनाथ शेडगे यांनी केले असून चित्रपटाचे कथा, पटकथा,संवाद आबा गायकवाड यांनी लिहिले आहेत. समाजातील वास्तवाचे भावविश्व उलगडून दाखविणारा अ.ब.क. हा बहुचर्चित चित्रपट येत्या८ जून पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे......!
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

देसी गर्ल प्रियांका 'क्वांटिको'मधून बाहेर