Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सानंदच्या रंगमंचावर विजय केंकरे यांचे मास्टर माइंड हे रोमांचकारी नाटक

Master mind
, शुक्रवार, 19 एप्रिल 2024 (22:42 IST)
सानंद ट्रस्टच्या पाच प्रेक्षक गटासाठी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक विजय केंकरे दिग्दर्शित 'मास्टर माईंड' या थ्रिलर नाटकाचे सादरीकरण 20 एप्रिल 2024 रोजी पासून स्थानिक यू. सी.सी ऑडिटोरियम (देवी अहिल्या विद्यापीठ, खंडवा रोड, इंदूर) येथे होणार आहे.

सानंद ट्रस्टचे अध्यक्ष श्री.श्रीनिवास कुटूंबळे व मानद सचिव श्री.जयंत भिसे म्हणाले की, विजय केंकरे यांनी अनेक टीव्ही मालिका, चित्रपट, आणि रंगमंचावरील नाटकांचे दिग्दर्शन केले आहे. पण आपण आपल्या कामाच्या व्यापातही सर्वात जवळ रंगभूमी ठेवली आहे. आपण रंगमंचावरील दिग्दर्शित केलेल्या कौटुंबिक, विनोदी, संदेश देणारे आणि रहस्यमयी यशस्वी नाटकाची भलीमोठी यादी आहे. दिग्दर्शक म्हणून आपली ही106 वी कलाकृती आहे.

आदिती सारंगधर आणि आस्ताद काळे हे दोघे ही मराठी चित्रपट, मालिका आणि नाट्यसृष्टीतील प्रस्थापित कलाकार आहेत आणि प्रेक्षकांच्या हृदयाला भिडणाऱ्या अभिनयासाठी प्रसिद्ध आहेत. हे दोघे कलाकार अनेक वर्षांनी रंगभूमीवर एकत्र दिसणार आहेत. 

लेखक -प्रकाश बोर्डवेकर,  रंगावृत्ती सुरेश जयराम, नेपथ्य-प्रदीप मुळ्ये, संगीत अशोक पत्की, प्रकाश योजना-शीतल तळपदे, वेशभूषा-मंगल केंकरे, सूत्र संचालन श्रीकांत तटकरे,व निर्माते अजय विचारे. 
 
सानंद ट्रस्टचे श्री कुटुंबळे व श्री भिसे यांनी सांगितले की नजरबंदी अतिवेगवान खेळ, रहस्यमयी नाटक 'मास्टर माईंड' हे नाटक 20 एप्रिल 2024 शनिवार रोजी रामूभैया दाते गटासाठी दुपारी 4 वाजता, राहुल बारपुते गटासाठी सायंकाळी 7:30 वाजता आणि त्याच प्रमाणे 21 एप्रिल 2024 रविवारी रोजी मामा मुजुमदार गटासाठी सकाळी 10 वाजता, वसंत गटासाठी दुपारी 4 वाजता, आणि बहार गटासाठी सायंकाळी 7:30 वाजता रंगणार आहे.   

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कन्नडमध्ये बोलल्याबद्दल अभिनेत्री हर्षिका पूनाचा यांच्यावर हल्ला