Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आयुष्याच्या गणिताचं सूत्र अधोरेखित करणारा... सिद्धांत

आयुष्याच्या गणिताचं सूत्र अधोरेखित करणारा... सिद्धांत
, मंगळवार, 26 मे 2015 (16:27 IST)
सध्या मराठी सिनेमाला सुगीचे दिवस आले आहेत.  सिनेमाच्या निमित्ताने हाताळले जाणारे आशयघन विषय सामान्यांना जगण्याची नवी दृष्टी देणारे आहे.  फॅण्ड्री, शाळा आणि अनुमती या सिनेमांची नावे आग्रहाने घेता यासारख्या अभिरूचीसंपन्न आणि आणि दर्जेदार सिनेमांची निर्मिती करणाऱ्या निर्मितीसंस्थेचा नवा सिनेमा सिद्धांत येत्या २९ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
 
‘नवलाखा आर्ट्स मीडिया अॅण्ड एण्टरटेन्मेण्ट’चे निलेश नवलखा आणि ‘होली बेसिल प्रॉडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड’चे विवेक कजारिया या दोघांसोबत यंदा ‘व्हर्च्यू एण्टरटेन्मेण्ट’चे अमित अहिरराव देखील सहभागी झाले आहेत. आयु्ष्याच्या गणिताचं सूत्र अधोरेखित करणारा... जगण्याचं भान देणारा आणि आयुष्यातील अनेक पेचप्रसंगाची उकल करू पाहणारा असा  हा ‘सिद्धांत’ सिनेमा आहे. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, स्वाती चिटणीस, किशोर कदम, गणेश यादव, सारंग साठ्ये, नेहा महाजन, माधवी सोमण, चंद्रशेखर कुलकर्णी, प्रशांत तपस्वी, सुरज सातव, बाबा आफळे आणि कांचन जाधव यांच्या सिनेमात महत्वाच्या भूमिका आहेत. 

संगीत दिग्दर्शक शैलेंद्र बर्वे आणि गीतकर सौमित्र (किशोर कदम) यांच्या जोडगोळीने सजलेल्या गाण्यांना स्वरबद्ध केले ते गायक शंकर महादेवन आणि  मकरंद देशपांडे यांनी.  चवीने चवीने जगणे…, थोडेसे आहे गुंतलेले…, घट्ट काही सुटले… चित्रपटाचा आत्मा असलेली ही गाणी प्रेक्षकांना आवडणारी आहेत. 
webdunia
 
विशेष म्हणजे या सिनेमाची ख्याती आता सातासमुद्रापार पोहोचली आहे.  सिद्धांत या मराठी सिनेमाची निवड टोरांटो येथील इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ साउथ अमेरिका (IFFSA ) तसेच न्यूयॉर्क इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलसाठी करण्यात आली आहे. हा सिनेमा आजोबा अप्पा ठोसर म्हणजेच विक्रम गोखले आणि त्यांचा नातू वक्रतुंड ठोसर म्हणजेच अर्चित देवधर यांच्या आयुष्याभोवती फिरतो. त्यांच्यामधल्या नात्याचा एक अतूट धागा हा गणिताचा सिद्धांत आहे. हा सिनेमा जसजसा खुलत जातो तसतसे नात्याचे नवनवे पदर उलगडत जातात, पण या सगळ्याला गुंफणारा जो धागा आहे... तो प्रेमाचा, विश्वासाचा, नात्याचा आणि तत्त्वांचा. या आशयघन कलाकृतीला चार चाँद लावणारा अभिनय ‘सिद्धांत’च्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे यात काही शंका नाही. 
webdunia
जगण्याला अर्थ देणारा आजोबा आणि नातू यांच्या नात्याला एका वेगळ्या अर्थाने अधोरेखित करणारा असा हा सिनेमा आहे. आजपर्यंत कार्यकारी निर्मात्याच्या भूमिकेत असणारे विवेक वाघ या सिनेमाने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करीत आहेत “आतापर्यंत 'चेकमेट', 'रिंगा रिंगा', 'शाळा', 'फँड्री', 'अजिंक्य' अशा एकापेक्षा एक सरस सिनेमांच्या आरेखनात अन् कार्यकारी निर्मात्याच्या भूमिकेत एक वेगळा अनुभव आणि आनंद मिळाला, पण दिग्दर्शना पलीकडच्या एका वेगळ्या दृष्टिकोनाची जाणीव सकारात्मक अर्थाने झाली. जगण्याला वास्तवाला भिडणा-या, सिनेमाने मनात जागा केली आहे”. 
webdunia
माझ्यावर विश्वास टाकणा-या निर्मात्यांचा आणि माझ्या दिग्दर्शनातील पदार्पणात मला सांभाळून घेणा-या कलाकारांचा आणि माझ्या टीमचा आभारी आहे. असे विवेक वाघ यांनी ‘सिद्धांत’ विषयी बोलताना सांगितले.
webdunia

नात्यांचा वेध घेणारा... आयुष्याचं सूत्र शोधताना त्यामधल्या प्रश्नांच्या गणिताची उकल करणारा असा हा ‘सिद्धांत‘ येत्या २९ मे २०१५ राज्यभरात प्रदर्शित होईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi