Article M Arathi Film Preview %e0%a4%89%e0%a4%9a%e0%a4%b2%e0%a4%be %e0%a4%b0%e0%a5%87 %e0%a4%89%e0%a4%9a%e0%a4%b2%e0%a4%be 111030100009_1.htm

rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उचला रे उचला

- चंद्रकांत शिंदे

उचला रे उचला
WD
निर्माते यशवंत चौघुले यांनी आपल्या क्षितीज मुव्हीज इंटरनॅशनल या बॅनरखाली उचला रे उचला या विनोदी चित्रपटाचा मुहुर्त नुकताच मुंबईत केला. गणेशाच्या पूजनाने चित्रपटाचा मुहुर्त झाला. मुहुर्ताचा शॉट फू बाई फूने लोकप्रिय झालेल्या वैभव मांगले आणि प्रिया बेर्डे यांच्यावर चित्रित करण्यात आला. या चित्रपटाद्वारे यशवंत चौघुले प्रथमच दिग्दर्शनही करीत आहेत. अमोल भावे यांच्यासह ते संयुक्तपणे दिग्दर्शन करणार आहेत. यशवंत चौघुले यांनी यापूर्वी बारबालांच्या जीवनावर चौकोन व इच्छा माइया बायकोची ही नाटके तयार केली होती. याशिवाय मनातल्या मनात हा चित्रपटही निर्माण केला आहे. किडनी ट्रान्सप्लान्ट या विषयावरही त्यांनी लघुपट तयार केला आहे.

मरण हे अटळ आहे. भूतलावर आलेल्या प्रत्येक जीवाचा अंतिम दिवस ठरलेला असतो. स्वतःचे मरण जवळ आले की मानव खूपच संवेदनशील व हळवा होतो़. आपले मरण टाळण्यासाठी परमेश्वराबरोबर यमराजाचा ही धावा करू लागतो. कधी कधी मनात पुसटशी शंका ही येते की यम चुकला तर? उचला रे उचला या कथानकावरच आधारित आहे. कथा गजेंद्र कोरे यांची असून पटकथा संवाद गजेंद्र कोरे आणि यशवंत चौधुले यांचे आहेत. संगीत चिनार महेश यांचे आहे. वैभव मツगले, प्रिया बेर्डे यांच्याबरोबर आनंद इंगळे, तृप्ती भोईर, संजय खापरे, ओंकार कर्वे, उदय सबनीस, रविंद्र बेर्डे, अभिजीत चव्हाण, भरत गणेशपुरे, किशोर नांदलसकर, अनिकेत केळकर, किशोर प्रधान, जयवंत वाडकर, प्राजक्ता केळकर, प्रदीप पटवर्धन, महेश सुभेदार, रमेश निगडे इत्यादि कलाकार चित्रपटात दिसणार आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi