Article M Arathi Film Preview %e0%a4%a4%e0%a5%81%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ae 112051900001_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तुकाराम

तुकाराम
निर्माता- संजय छाब्रिया
दिग्दर्शक- चंद्रकांत कुलकर्णी
कथा, पटकथा आणि संवाद- अजित दळवी, प्रशांत दळवी
छायांकन- राजन कोठारी
संगीत- अशोक पत्की, अवधूत गुप्ते

कलाकार- जितेंद्र जोशी-संत तुकाराम, राधिका आपटे- आवळी, विणा जामकर-रख्मा, शरद पोंक्क्षे- बोल्होबा आंबीले, प्रतीक्षा लोणकर- कणकी, यतीन कार्येकर-मंबाजी गोसावी
PR
PR


महाराष्ट्राचे आराध्य दैवत संत तुकाराम यांच्या जीवनावर 'तुकाराम' हा चित्रपट बनवण्यात आला असून प्रदर्शनासाठी सज्ज आहे. चित्रपटाचे लेखन, संगीत, अभिनय आणि निर्मिती मूल्ये उच्च दर्जाचे असून चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच अपेक्षा निर्माण केल्या आहे.

चित्रपटाविषयी-
चित्रपटात सामान्य माणसाचा संत बनण्यापर्यंतचा प्रवास रेखाटण्यात आला आहे. या प्रवासात आपणांस प्रबळ आत्मविश्वास प्राप्त होतो. तुकारामांच्या काळात महाराष्ट्रातील जनतेचे आदिलशाही आणि निजामशाही शोषण करत होती. या महान संताने अशावेळी सामान्य माणसाचा आत्माभिमान जागवला. त्यांचे जीवन महत्त्वाचे असल्याची भावना त्यांनी जनमनात पेरली. हे
करून त्यांनी मराठा साम्राज्यासाठी सैनिक जमवण्यास मदतच केली. त्यांनी निराश, हताश समाजात आत्मविश्वास आणि जोश भरला. चमत्कार यापेक्षा आणखी काय वेगळा असू शकतो.

तुकारामांविषय
भगवान विठ्ठलाचे परमभक्त असलेल्या कुणबी कुटुंबात पुण्याजवळील देहू या गांवी १६०८ मध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचे बालपण इतर मुलांसारखेच गेले. भगवान विठ्ठलावर त्यांची अपार निष्ठा होती. मोठ्या भावाने पूर्णपणे अध्यात्मास वाहून घेतल्याने घरची जबाबदारी तुकारामांवर आली. त्यांच्या पहिल्या पत्नीस-रखमास मुल न झाल्याने घरच्यांच्या दबावात त्यांनी आवळी सोबत दुसरे लग्न केले. एक चांगला मुलगा आणि चांगला पती बनण्याचा त्यांच्या सारखा प्रयत्न होता. मात्र भयानक दुष्काळाने त्यांच्या स्वप्नांचा चुराडा केला. त्यांचे कुटुंबीय दुष्काळात बळी पडले.

या तीन वर्षाच्या दुष्काळात ते अध्यात्माकडे वळले. त्यांनी जबाबदार्‍या पार पाडतच आध्यात्मिक उन्नती साधून भोवतालचे दु:ख कमी करण्यास प्राधान्य दिले. चांगला मुलगा, पती, मित्र असण्यासोबतच आपण एक चांगला माणूस असणे अधिक महत्त्वाचे असल्याचे ते मानत होते. आणि चांगला माणूस बनण्याच्या ध्यासानेच त्यांना संत बनवले.

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi