Article M Arathi Film Preview %e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%80 %e0%a4%a1%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%be %e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%a0%e0%a4%be 108052400004_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

निशाणी डावा अंगठा

निशाणी डावा अंगठा
IFM
शिक्षण क्षेत्रातील कारभारावर उपहासात्मक लिहिलेल्या 'निशाणी डावा अंगठा' या बुलढाण्याचे लेखक रमेश इंगळे-उत्रादकर यांच्या कादंबरीवर प्रख्यात दिग्दर्शक पुरूषोत्तम बेर्डे चित्रपट बनवताहेत. उत्रादकर यांची ही कादंबरी गेल्या दोन वर्षांच चांगलीच चर्चेत झाली आहे. बेर्डे यांनी ही कादंबरी वाचली आणि त्यांना त्यावर चित्रपट बनवावासा वाटला. आता त्यावर काम सुरू झाले आहे. विशेष म्हणजे बेर्डे यांनी 'भस्म' या चित्रपटानंतर म्हणजे तब्बल बारा वर्षांनंतर चित्रपट दिग्दर्शनात पाऊल ठेवले आहे.

'काय द्याचं बोला?' ची पटकथा लिहिणारे अजित व प्रशांत दळवी यांनीही 'निशाणी'ची पटकथा लिहिली आहे. हे दोघेही मराठवाड्यातीलच असल्याने कादंबरीतील विषयाला आणि भाषेला तेच न्याय देऊ शकतील, असे वाटल्याने बेर्डे यांनी त्यांच्याकडे हे काम सोपवलं. या चित्रपटात अशोक सराफ, दिलीप प्रभावळकर, मिलिंद शिंदे, निर्मिती सावंत, मकरंद अनासपुरे, मंगेश देसाई, शशांक शेंडे ही मंडळी आहेत.

या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मकरंद अनासपुरे याने यात एक गाणं गायलं आहे. संगीत दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली मकरंद चक्क गायलाय. त्यामुळे त्याचे गाणे पहाणे आणि ऐकणे हाही एक चांगला अनुभव ठरेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi