Article M Arathi Film Preview %e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%a1 %e0%a4%87%e0%a4%a8 %e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%a8%e0%a4%be 109031900027_1.htm

rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मेड इन चायना

मेड इन चायना
आमदार अप्पासाबे जगदाळे पिंपळगावचे प्रतिष्ठीत राजकीय नेते आहेत. ग्रामीण विकासाच्या अनेक आधुनिक योजना राबवून त्यांनी आपल्या भागाचा विकास केला आहे. बदलत्या काळाला अनुसरून त्यांनी थडानी ग्रुपबरोबर करार करून आपल्या भागात स्पेशल इकॉनॉमिक झोन (सेझ) आणण्याचा प्रयत्न चालवला आहे. या कामात त्यांचा पुतण्या दीपक व मुलगी प्राची त्यांना मदत करतात. पण दुसरा पुतण्या मोहित मात्र त्यांना विरोध करतो. आधुनिक शेतीतून या भागाचा विकास होईल असे त्याचे मत आहे.

अप्पासाहेबांचा पारंपारिक विरोधक कैलास शिंदे याचाही सेझला विरोध आहे. थडानीच्या पैशातून सेझसाठी जमिनी ताब्यात घेण्याची कामगिरी दीपक करतो आहे. दीपक जमिनविक्रीच्या कमिशनमधून मिळणारे पैसे दारू व बारबालांवर उडवत असतो. अप्पासाहेबांनी जाणीवपूर्वक दीपकला व्यसनी बनवून बिघडवले असा दीपकची पत्नी योगिताचा समज आहे. त्यामुळे अप्पासाहेबांवर तिचा राग आहे.

  आजच्या काळातील आसपास घडणारे सामाजिक व राजकिय वास्तव दाखवणारा तसेच उत्कंठा वाढवणारी रहस्यकथा पाहण्याचा कलात्मक आनंद देणारा हा चित्रपट आहे.      
अप्पासाहेब सेझची योजना गावापुढे मांडतात. त्याचवेळी मोहितला मुलगा होणार असल्याची बातमी त्याची बायको निलंजना देते. एकीकडे जगदाळेंचा वारस निलंजनाच्या पोटात वाढत असताना गावात राजकारण रंगू लागतं.सेझला विरोध करणारा कैलास शिंदे व त्याची संघटना गावात आंदोलन उभे करतात. सभा, मोर्चे, मारामार्‍या होऊ लागतात. डाव- प्रतिडाव सुरू होतात.त्यात पिंपळगावची शांती नष्ट होते.

या घटना खूप वेगाने घडतात. 'जमीन दे' म्हणून दीपकने टाकलेल्या दबावाला बळी पडून मोहितचा गरीब शेतकरी मित्र श्रीकांत आत्महत्या करतो. योगिताही दीपकच्या वागण्यामुळे अप्पासाहेबांवर संतापत असते.

PR
अशा पार्श्र्वभूमीवर एक दिवस थडानीच्या मॉलचे उद्घाटन करताना अप्पासाहेब जगदाळेंचा एका बुरखाधारी व्यक्तीकडून पिस्तूलाच्या गोळया घालून खुन होतो. हा खुन कुणी केला? का केला? याची उत्कंठापूर्वक रहस्यकथा या चित्रपटातून उलगडत जाते. त्याचवेळी सेझसारख्या आधुनिक विकासाच्या संकल्पना गावात आल्यावर त्याच्या बाजूने आणि विरोधात वास्तव प्रतिक्रिया काय उमटल्या याचे यथार्थ चित्रणही मेड इन चायना या चित्रपटात येते. आजच्या काळातील आसपास घडणारे सामाजिक व राजकिय वास्तव दाखवणारा तसेच उत्कंठा वाढवणारी रहस्यकथा पाहण्याचा कलात्मक आनंद देणारा हा चित्रपट आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi