Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कुंभमेळ्यात अन्नदानाला महत्त्व

कुंभमेळ्यात अन्नदानाला महत्त्व

वेबदुनिया

WD
कुंभंमेळा भरतो त्या ‍ति‍र्थक्षेत्रावर अन्नदान व तिळदानाचे खूप महत्त्व आहे. येथे थोडेही दान केले तरी मनाप्रमाणे फळ मिळत असते, अशी भाविकांची धारणा आहे. तसेच माघ मासात अन्नदानाचे विशेष महत्त्व असल्याचे पुराणात सांगितले आहे. अन्न हा केवळ शरीराच नाही तर आपल्या जीवनाचा आधार असून अन्नदान हे प्राणदानासमान आहे. इतर दानधर्माच्या तुलने अन्नदानाला अन्यंन साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.

'कुंभमेळा' हा वेदकाळापासून प्रचलित आहे, असे मानले जाते. समुद्रमंथनातून जे अमृत बाहेर निघाले होते. त्याचे चार थेंब त्र्यंबकेश्वर, उज्जैन, प्रयाग, हरिद्वार या चार तीर्थक्षेत्रावर पडल्याने येथे कुंभमेळा भरतो. कुंभमेळ्याला पौराणिक व ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. सिंह राशीत गुरु प्रवेश करतो तेव्हा सिंहस्थ आणि कुंभ राशीत गुरु म्हणजे कुंभमेळा असे म्हटले जाते.

माघ महिन्यात 14 जानेवारीला मकरसंक्रांतीपासून हरिद्वार येथे गंगेच्या काठावर कुंभमेळा भरला आहे. तेथे लाखो लोक लावत असतात. माघ महिन्याला पुण्य मास असे ही‍ म्हटले जाते. शुक्ल पक्षात उत्तम मुहूर्त पाहून ब्राह्मण भोजन देण्याचे महत्त्व आहे. एक हजार ब्राह्मणांना भोजन देण्‍याचे पुराणात म्हटले आहे. मात्र आपल्या यथाशक्तीप्रमाणेही केल्याने त्याचे पुण्य मिळत असते. भोजनपूर्व ब्राह्मणांनी स्वस्तिवाचन केले पाहिजे. सोन्याच्या अथवा तांब्याच्या कळस ठेवून विष्णुची प्रतिमेची स्थापना केली पाहिजे. त्यानंतर ब्राह्मण भोजन देऊन त्यांना दान- दक्षिणा दिली पाहिजे.

अन्नदान केल्यानंतर आचार्य यांना वासरूसह काळी गाय व इतर ब्राह्मणांना बैल अथवा घोडा देण्याची प्रथा आहे. तसेच अन्न हे पूर्णब्रह्म असल्याने ते वाया जाता कामा नये. त्यामुळे शिल्लक राहिलेले अन्न दीन दुबळ्यांना वाटून द्यावे.

ब्राह्मण भोजन ग्रहण करीत असताना यजमान यांनी होमहवन केला पाहिजे. पुराणात सांगितलेल्या व्रतापेक्षा अन्नदान सगळ्यात श्रेष्ठ आहे.

जे भाविक विधीपूर्वक अन्नदान करतात त्यांना पुण्य मिळत असते. कुंभमेळा भरतो त्या ठिकाण अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान समजले जाते. त्र्यंबकेश्वर, उज्जैन, प्रयाग, हरिद्वार येथे अन्नदान केल्याने मनाप्रमाणे फळ मिळते. हरिद्वार येथे येणार्‍या साधूंना खिचड़ी, भात, कच्चे तांदुळ यांचे दान केले जाते. अन्नदाना बरोबरच तिळदानाचेही महत्त्व आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi