Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाशिवरात्रीला पहिले शाही स्नान

महाशिवरात्रीला पहिले शाही स्नान
PR
PR
हरिद्वार येथे सुरू झालेल्या महाकुंभमेळ्यातील पहिले शाही स्नान 12 फेब्रुवारीला महाशिवरात्रीच्या शुभपर्वावर होणार आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात तयारी सुरू झाली आहे. नागा साधुंचा जुना अखाडे पहिले शाही स्नानासाठी सज्ज झाले आहे.

महाशिवरात्रीच्या शुभपर्वावर हरिद्वार येथील पवित्र गंगा नदीवर सात अखाडे पहिले शाही स्थान करणार आहेत. सगळ्यात आधी नागा साधुंचा जुना अखाडा सकाळी 11 वाजता हरकी पेडीवर स्नान आटोपतील. जूना अखाडासोबत आवाहन व अग्नि अखाडे ही स्नान करणार आहेत.

तिनही अखाड्यांनंतर अटल अखाडे व महानिर्वाह अखाडे स्नान करणार आहेत. त्यानंतर निरंजनी व आनंद अखाडे स्नान करतील. दोनही उदासीन अखाडे अर्थात मोठा उदासीन व नवीन उदासीन तसेच तिनही बैरागी अखाडे व एक निर्मल अखाडे यांची सध्या आगमन झालेले नाही. त्यामुळे पहिले शाही स्थान उर्वरित सहा अखाडे करू शकणार नाही.

महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी 10 वाजे आधी व संध्याकाळी पाच वाजेनंतरच हरकी पेडीवर सामान्य नागरिकांना स्नान करण्याची व्यवस्था करून देण्यात आली आहे.

कुंभमेळ्यात जमलेल्या सांधुमध्ये वाद होऊन त्याचे रूपांतर खुनी संघर्षात न होण्याची पोलीस प्रशासनाकडून जातीने खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे पहिल्या शाही स्थानदरम्यान प्रत्येक आखाड्याच्या स्नानामध्ये साधारण एक ते दीड तासांचे अंतर ठेवण्‍यात आले आहे, असे कुंभमेळा पोलीस अधीक्षक अजय जोशी यांनी सांगितले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi