Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कुंभमेळा: तीन प्रचल‍ित कथा

कुंभमेळा: तीन प्रचल‍ित कथा
PR
PR
श्री गोपाळदत्त शास्त्री महाराज हे रामानुज संप्रदायाचे प्रमुख आहेत. 'कुंभ महात्म्य' हे त्यांचे स्वलिखीत पुस्तक. त्यांनी यात कुंभमेळ्याविषयी महर्षि दुर्वासांची कथा, कद्रू-विनताची कथा व समुद्रमंथनाची कथा या तीन प्रचलित कथांचा समावेश केला आहे. त्या पुढील प्रमाणे...

महर्षि दुर्वासांची कथा
या कथेत इंद्रदेव आणि दुर्वासा ऋषी यांचा प्रसंग आला आहे. दुर्वासा ऋषींनी दिलेल्या दिव्य पुष्पहाराचा इंद्रदेवाकडून अपमान झाला होता. तो अपमान ऋषींना सहन झाला नव्हता. सविस्तर कथा अशी की, इंद्रदेवांची हत्तीवरून स्वारी निघाली होती. तेव्हा दुर्वासा ऋषींनी त्यांना पुष्पहार देऊन त्यांचे स्वागत केले होते. मात्र इंद्रदेवाने तो पुष्पहार हत्तीच्या मस्तकावर ठेऊन दिला. नंतर हत्तीने तो पुष्पहार जमीनीवर टाकून पायाने कुचलला होता. त्याचा दुर्वासा ऋषींना खूप राग आला. त्यांना इंद्रदेवाला शाप दिला. शापाचा परिणाम इतका झाला की, सगळीकडे हाहाकार माजला. दुष्काळग्रस्त स्थिती निर्माण झाली. प्रजा त्राही-त्राही झाली. नंतर देवांनी समुद्र-मंथन केले त्यातून लक्ष्मी प्रकटली, वृष्टी झाली त्याने शेतकरीवर्ग सुखावला.
webdunia
PR
PR


समुद्रमंथनातून अमृतकलश बाहेर आले होते. ते राक्षसांनी पळवून नागलोकात लपवून दिले. तेथे गरुडाकडून त्याचा उध्दार झाला व त्यानेच ते क्षीरसागरापर्यंत पोहचविले. क्ष‍ीरसागरापर्यत पोहचण्यात गुरूडाने ज्या चार ठिकाणी अमृतकुंम ठेवले होते. ते चार ‍स्थळ म्हणजे त्र्यंबकेश्वर, उज्जैन, प्रयाग, हरिद्वार हे होय. त्यामुळे हे चार तीर्थक्षेत्रावर कुंभमेळा भरतो.

कद्रू-विनताची कथा
दुसरी कथा ही प्रजापती कश्यप यांच्या दोन पत्नी संदर्भात आहे. एकदा कश्यप राजाच्या दोन पत्नींमध्ये सूर्याच अश्व (घोडा) काळा आहे की पांढरा, यावरून वाद होतो. जी खोटी ठरेल ती दासी बनेल, अशी त्यांच्यात शर्यत लागली.

कद्रूचा मुलगा नागराज वासु व विनताचा पुत्र गरुड होता. कद्रूने आपल्या नागवंशाकडून प्रेरणा घेऊन आपल्या काळेपनामुळे सूर्याच्या अश्वांला झाकून टाकले होते. त्यामुळे सूर्याचा अश्व काळा दिसत होता. ते पाहून विनता आपली शर्यत हरली व ती दासी झाली. परंतु दासीच्या रूपात ती फार दु:खी होती. तेव्हा विनता आपला पुत्र गरुडाला म्हणाली, कद्रूने शर्यत ठेवली की, नागलोकातून वासुकि-रक्षित अमृतकुंभ आणून देईल, तेव्हाच ती दासत्वतून मुक्त होईल.

विनताच्या पुत्राने स्विकारलेले दायित्व यशस्वी केले. गरुड अमृतकुंभ घेऊन भू-लोक मार्गे पिता कश्यप मुनि यांच्या उत्तराखंडमधील गंधमादन पर्वतावर स्थित आश्रमाकडे निघाला. दरम्यान, वासुकीने तशी इंद्रदेवाला सूचना दिली. इंद्रदेवाने गरुडावर चार वेळा आक्रमण केला. त्याच्यात झालेल्या घमासाम युध्दात ज्या चार ठिकाणी अमृताचे थेंब पडले, त्याचा चार ठिकाणी कुंभमेळा भतो.

समुद्रमंथनाची कथा
कुंभमेळ्या संदर्भात समुद्रमंथनाच्या कथेला अधिक महत्त्व देण्यात आले आहे. समुद्रमंथनातून अमृत कलश बाहेर आला व तो राक्षसांनी पळविला होता. तेव्हा स्वत: विष्णु भगवान यांनी मोहिनीचे रूप धारण करून राक्षसाकडून कट रचून परत मिळवला होता. मोहिनीच्या नाचकामत अमृतकलशतील चार थेंब भूलोकात पडले. ज्या चार ठिकाणी ते अमृताचे थेंब पडले, ते ठिकाण आज तिर्थक्षेत्र म्हणून प्रसिध्द आहे. त्या चार ठिकाणी कुंभमेळा भरत असतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi