Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अजित पवारांना पीएम मोदींची 'एक है तो सेफ है' ही घोषणा आवडली,'बटेंगे तो कटेंगे' घोषणेला विरोध

ajit pawar
, बुधवार, 13 नोव्हेंबर 2024 (17:30 IST)
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'एक है तो सेफ है' घोषणेचे समर्थन केले, परंतु योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे' घोषणेला विरोध केला आणि त्याला महाराष्ट्राच्या वैचारिक वारशापेक्षा वेगळे म्हटले

आपला पुतण्या आणि आता प्रतिस्पर्धी उमेदवार युगेंद्र पवार यांना राजकारणात रस नाही, बारामतीत राहणेही आवडत नाही, असा दावाही त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेला समर्थन दिले आणि म्हणाले, भारत एकत्र राहिला तरच सुरक्षित राहिल.या घोषणा मध्ये काही चुकीचे नाही आपण एकत्र राहिलो तर सर्वांची प्रगती होईल. मात्र योगी आदित्यनाथ यांची घोषणा बटेंगे तो कटेंगे चुकीची आहे.आम्ही त्याला समर्थन देत नाही.उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशात लोकांची विचारसरणी वेगळी आहे, पण अशी विधाने इथे चालत नाहीत. माझ्या मते अशा शब्दांच्या वापराला महाराष्ट्रात काहीच महत्त्व नाही.
 
पवार म्हणाले की, महाराष्ट्र हे छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि शिवाजी महाराजांचे राज्य आहे. महाराष्ट्रातील लोक वेगळे आहेत आणि त्यांचा विचार वेगळा आहे. छत्रपती शाहू महाराज, छत्रपती  शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, बाबा साहेब आंबेडकर यांची विचारधारा कोणी सोडली तरी महाराष्ट्र त्यांना सोडणार नाही. असे ते म्हणाले. 
Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Maharashtra Assembly Election 2024 Live in Marathi मोदी सरकार वक्फ कायद्यात सुधारणा करणार, अमित शहांची घोषणा