सध्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकाचा बिगुल वाजला असून सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहे.काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता.
गुजरात काँग्रेसचे नेते परेश धनानी हे महाराष्ट्रातील नाशिकमध्ये पक्षाच्या प्रचारात व्यस्त होते. यादरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला. हा हृदयविकाराचा झटका किरकोळ असला तरी. रुग्णालयात त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली असून आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.
गुजरात काँग्रेसचे नेते परेश धनानी यांनी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राजकोटमधून भाजपच्या पुरुषोत्तम रुपाला यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती.परेश धनानी यांनी 2002 मध्ये अमरेली विधानसभा मतदारसंघातून पुरुषोत्तम रुपाला यांचा पराभव केला होता.