Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर यांचा पक्षातून राजीनामा, भाजप पक्षात प्रवेश करणार

Jitesh Raosaheb Antapurkar
, शुक्रवार, 30 ऑगस्ट 2024 (12:45 IST)
Jitesh Raosaheb Antapurkar on X
या वर्षाच्या अखेरीस महाराष्ट्र विधानसभा निवडणुका होणार असून अद्याप तारख्या जाहीर केल्या नाही. विधानसभा निवडणुकीपूर्व महाराष्ट्र काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे नांदेडच्या देगलूर-बिलोली विधानसभाचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी तातडीनं काँग्रेस पक्षातून राजीनामा दिला असुन आज ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. 

नांदेडच्या देगलूर-बिलोलीविधानसभा मतदार संघाचे आमदार जितेश अंतापूरकर यांच्यावर लोकसभा निवडणुकींनंतर क्रॉसवोटींग करण्याचा आरोप केला. ते पक्षाच्या रडारवर होते. क्रॉस व्होटिंग करणाऱ्यांमध्ये जितेश अंतापूरकर आणि झिशान सिद्दीकी यांचे नाव समोर आले असून महाराष्ट्र काँग्रेसने या बाबत तक्रार दिल्लीला केली होती.

आता काँग्रेसने या बाबत कारवाई केली असून या दोन्ही आमदारांना बाहेरचा रास्ता दाखवला आहे. आमदार जितेश यांनी राजीनामा दिला असून आता झिशान सिद्दीकी काय करतात यावर लक्ष लागले आहे. 
नांदेडच्या देगलूर-बिलोली विधानसभा मतदार संघाचे आमदार जितेश अंतापूरकर आज सायंकाळी भाजपमध्ये मुंबईतील भाजपपक्षाच्या कार्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. 
Edited by - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राष्ट्रपतींनी केवळ कोलकात्याकडेच नाही तर महाराष्ट्राकडेही लक्ष द्यावे-काँग्रेस नेते रमेश चेन्निथला