Eknath Shinde News : 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात राज्यातील 288 जागांवर मतदान होणार आहे. 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 बाबत आरोप-प्रत्यारोपांचा फेरा सुरूच आहे. भाजप आणि काँग्रेस एकमेकांवर हल्ला करण्याची एकही संधी सोडत नाहीत.
एकीकडे भाजप विजयानंतर पुढचे सरकारही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बनणार असल्याचे सांगत आहे.भाजप शिंदे यांना केवळ आमिष दाखवत असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.
भाजपच्या पोस्टरवर त्यांचा आणि पंतप्रधानांचा फोटो आहे, पण एकनाथ शिंदे यांचा फोटो पासपोर्ट साइजचा आहे. काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा भाजपचा चेहरा आहे. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होतील असे भाजपचे म्हणणे आहे.मात्र त्यांचाच फोटो पोस्टर मधून गायब आहे. भाजप कोणत्याही चेहऱ्याची घोषणा करत नाही.भाजपचे खायचे दात एक आणि दाखवायचे दूसरे आहे.
बॅनरवर तिन्ही पक्षांची चिन्हे आहेत पण चेहरे फक्त पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे आहेत. भाजपच्या बॅनरवर शिंदे कुठेच नाहीत. यावेळी नागपूर दक्षिण पश्चिममधून फडणवीस यांचा विजय निश्चित नसल्याचा दावा पटोले यांनी केला. पटोले म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे ध्येय स्पष्ट आहे. त्यांना भाजपचा पराभव करायचा आहे.मुख्यमंत्र्यांचा निर्णय आमचे सर्वोच्च नेतृत्व घेईल.