Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्व शरद पवारांच्या गटाचे नेते माणिकराव सोनवलकरांचा भाजप मध्ये प्रवेश

sharad panwar
, सोमवार, 12 ऑगस्ट 2024 (15:07 IST)
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्व शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे साताऱ्यातील नेते माणिकराव सोनवलकरांनीअनेक कार्यकर्त्यांसह  भाजपमध्ये प्रवेश केला असून हा शरद पवारांच्या गटाला मोठा धक्का आहे. 
माणिकराव सोनवलकरांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. सोनवलकरांचे भाजपमध्ये प्रवेश केल्या बद्दल भाजपच्या नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. 
 
या वेळी बावनकुळे म्हणाले, विधानसभा निवडणुका जवळ आल्यामुळे महाविकास  आघाडी विविध समुदायांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.आज राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्यातील नेते माणिकराव सोनवलकरांनी हजारो कार्यकर्त्यांसह भाजप मध्ये प्रवेश केला आहे. ते शिक्षक आहे. 

या वर्षाच्या अखेरीस महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार असून राज्यातील सत्ताधारी आणि विपक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपाबाबत बैठका सुरु आहे. जागावाटपानंतर महाराष्ट्रात राजकारणाला वेग येणार असून कोणता पक्ष यंदाच्या महाराष्ट्र विधानसभांच्या निवडणुकीत बाजी मारणार याची सर्वांना उत्सुकता आहे. 
Edited by - Priya Dixit   
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आपल्याच मुलाला का चिरडायला निघाल्या होत्या राणी अहिल्याबाई होळकर ?