सध्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल सर्वत्र वाजत असून मराठा समाजासाठी आरक्षण मिळावे या साठी मनोज जरांगे पाटील लढत आहे.
सध्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल सर्वत्र वाजत असून मनोज जरांगे पाटीलांनी देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी मराठा समाजाचा उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे.
ते बीड, जालना, छत्रपती सम्भाजी नगर, फुलंब्री या मतदार संघातून निवडणूक लढवणार अशी घोषणा केली असून केज गेवराई आणि आष्टी मतदारसंघाबाबत स्थानिकांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. असे ते म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा करण्याआधीच पत्रकार परिषद घेतली.
आज संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन ते कोणत्या मरदारसंघातून लढवणार ते सांगणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे हे बीड मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार. तसेच जालना जिल्ह्यातील परतूर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार आहे संध्याकाळी पत्रकार परिषेदत ते जाहीर करणार आहे.