महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील जागावाटप आणि इतर मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी माविआची 7 ऑगस्ट रोजी बैठक होणार असून काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यावर पत्रकारांना सांगितले.
ते म्हणाले, माविआची जागावाटप आणि इतर मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी 7 ऑगस्ट रोजी बैठक होणार आहे. तसेच निवडणूक रॅली बाबत देखील चर्चा केली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुका या वर्षी ऑक्टोबर मध्ये होण्याची शक्यता आहे.
या पूर्वी सर्व पक्षांची विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरु झाली असून जागावाटपाचा निर्णय घेण्यासाठी माविआ 7 ऑगस्ट रोजी बैठक घेणार आहे. माविआ मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा समावेश आहे.
या बैठकीपूर्वी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला राज्य पक्षाच्या नेत्यांची भेट 3 ऑगस्ट पासून दोन दिवसांची भेट मुंबईला घेणार आहे. या साठी काँग्रेसने राज्य नेत्यांची एक समिती स्थापन केली असून समितीचे सदस्य 4 ऑगस्ट रोजी चेन्निथलांची भेट घेणार आहे.