महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहे. आता सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. सध्या जागावाटपाच्या सोबतच उमेदवारांचे नाव जाहीर करण्यावर विचारमंथन सुरु असून अद्याप कोणत्या पक्षाला किती जागा द्याव्या या वर निर्णय झालेला नाही.तर रामदास आठवले यांनी पक्षातून 21 जागांवर लढवण्याची मागणी केली आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिले असून त्यात 21 जागांची मागणी केल्याचे आठवले यांनी सांगितले.
आम्हाला किमान ८-१० जागा मिळाव्यात तसेच देवेंद्र फडणवीसांनी काही जागा रिपब्लिकन पक्षाला देणार असल्याचे म्हटले आहे. सरकार स्थापन झाल्यावर आम्हाला मंत्रिपद मिळावे आणि आमदारकी मिळावी अशी मागणी आठवले यांनी केली आहे.
ते म्हणाले, आम्ही महायुती सोबत राहणार आहोत. जनता पुन्हा महायुतीला निवडून आणेल असे ते म्हणाले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा छोटा पक्ष असला तरी त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. ज्यांच्यासोबत रिपब्लिकन पक्षाच्या मित्रपक्षांना सत्ता मिळते. हे देवेंद्र फडणवीस चांगलेच जाणतात. आमची भाजपशी युती आहे, त्यामुळे भाजपने आम्हाला त्यांच्या कोट्यातून जागा देण्याची मागणी त्यांनी केली आहे.