खासदार संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्राशी संबंधित सर्व बाबी दिल्लीत ठरवल्या जातील. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना आपले मुद्दे मांडण्यासाठी पुन्हा पुन्हा दिल्लीत यावे लागणार आहे. त्यांना पंतप्रधान आणि अमित शहा यांचे म्हणणे ऐकावे लागेल. अजित पवार नेहमीच उपमुख्यमंत्री होते आणि ते नेहमीच उपमुख्यमंत्री राहतील. त्यांच्या चेहऱ्यावरचीजी चमक लोकसभा निवडणुकीनंतर गायब झाली होती, ती आता परत आली आहे, हा ईव्हीएमचा चमत्कार आहे. तसेच ते पुढे म्हणाले की, 'ईव्हीएमचे मंदिर बांधले पाहिजे. त्यात तीन मूर्ती असाव्यात. एका बाजूला पंतप्रधान आणि दुसऱ्या बाजूला अमित शहा आणि मध्ये EVM असे वक्तव्य देखील संजय राऊतांनी केले आहे.#WATCH | Delhi: Shiv Sena (UBT) MP Sanjay Raut says, " All the things related to Maharashtra will be decided in Delhi...Eknath Shinde and Ajit Pawar will have to come to Delhi again and again to put forward their issues...they will have to listen to PM and Amit Shah...He (Ajit… pic.twitter.com/9lfW0Hk0MO
— ANI (@ANI) November 29, 2024