विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर ठिपले आहे. विधानसभा निवडणुकीत देखील महायुती आणि महाविकास आघाडी मध्ये चुरस रंगणार. शरद पवारांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाकडून 90 ते 100 जागांवर लढण्याची तयारी केली आहे. अशी शक्यता वर्तवली जात आहे.
शरद पवारांनी झूम मिटिंग घेऊन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
शरद पवारांची विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्राथमिकस्तरावर तयारी सुरु झाली असून पदाधिकाऱ्यांना झूम मिटिंग द्वारे सूचना देण्यात आल्या. गणपती उत्सवानंतर पक्षाला अहवाल दिला जाणार.
विधानसभा निवडणुका नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महाविकास आघाडीवर जागावाटपाची चर्चा सुरु आहे. महाविकास मध्ये ठाकरे गट अधिक जागांसाठी प्रयत्न करत आहे. तर काँग्रेसला अधिक जागा पाहिजे.तर आता शरद पवारांनी 100 जागांसाठी तयारी सुरु केली आहे. अद्याप महाविकास आघाडीने जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला नाही.त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाला किती जागा मिळणार हे ठरले नाही.