Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शरद पवार पुण्यातील इच्छुक उमेदवारांची मुलाखत घेणार

sharad panwar
, बुधवार, 9 ऑक्टोबर 2024 (16:32 IST)
महाराष्ट्र विधानसभा निवडणुका पुढील महिन्यात होण्याची शक्यता आहे.सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. अद्याप जागावाटपचर्चा साठी बैठकी घेतल्या जात आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी गेल्या काही दिवसांपासून राज्यभरातील उमेदवारांच्या मुलाखती घेत आहे. 

त्यांनी या पूर्वी उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील उमेदवारांच्या सभा घेतल्या आहे. 
शरद पवार यांनी आज बुधवारी पुणे शहर व जिल्ह्यातील उमेदवारांना मार्केट यार्डातील निसर्ग मंगल कार्यालयात बोलावून त्यांची मुलाखत घेतली.

महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही.  मात्र पुणे शहरातील उपलब्ध आठ जागांपैकी खडकवासला, हडपसर, पर्वती आणि वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे.

आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहरातील उपलब्ध आठ जागांपैकी खडकवासला, हडपसर, पर्वती आणि वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छुक आहे. तर काँग्रेस शिवाजीनगर, कसबा पेठ, पुणे कॅंटोन्मेंट मधून निवडणूक लढवू शकते. तर कोथरूडच्या भागातून शिवसेना उद्धव ठाकरे निवडणुका लढवू शकते.

मिळालेल्या माहितीनुसार, पक्ष सर्व आठ विधानसभा मतदारसंघांबाबत चर्चा करणार आहे कारण जागावाटपाची व्यवस्था अद्याप निश्चित झालेली नाही.आठही जागांवर अनेक उमेदवारांनी अर्ज केले असून, पवार आता त्यांची भेट घेणार आहे.
Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नागपुरात स्कुटरवरून खाली पडून ट्रकने चिरडून 7 वर्षाच्या मुलीचा मृत्यू