Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का, सूर्यकांता पाटील शरद पवारांच्या पक्षात जाणार

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का, सूर्यकांता पाटील शरद पवारांच्या पक्षात जाणार
, सोमवार, 24 जून 2024 (11:07 IST)
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसला आहे. माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी भाजपचा राजीनामा दिला आहे. त्या पुन्हा शरद पवारांच्या पक्षात जाणार आहे. सूर्यकांता पाटील यांनी 2014 मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आज मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात शरद पवार यांच्या उपस्थितीत त्या पक्षात प्रवेश करणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून सूर्यकांता भाजपवर नाराज होत्या. सूर्यकांता पाटील यांनी राजीनामा देताना सांगितले की, गेल्या 10 वर्षात खूप काही शिकलो. त्याबद्दल आम्ही भारतीय जनता पक्षाचेही आभारी आहोत.
 
त्यामुळे भाजपवर सूर्यकांता पाटील नाराज झाल्या होत्या
हिंगोली लोकसभा निवडणुकीसाठी सूर्यकांता पाटील यांनी भाजपकडे तिकीट मागितले होते. तिकीट न मिळाल्याने त्यांनी सोशल मीडियावर जाहीरपणे नाराजीही व्यक्त केली होती. आता त्यांनी राजीनामा दिला आहे. सूर्यकांता पाटील यांनी हिंगोली-नांदेड मतदारसंघाचे चार वेळा खासदार आणि एकदा आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयात त्या राज्यमंत्री होत्या. यानंतर त्यांनी संसदीय कामकाज मंत्रालयात राज्यमंत्रीपदही भूषवले.
 
सूर्यकांता पाटील यांची राजकारणातील प्रदीर्घ कारकीर्द
सूर्यकांता पाटील पहिल्यांदा 1980 मध्ये हदगाव मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. 1986 मध्ये सूर्यकांता पाटील काँग्रेसमधून राज्यसभेवर गेल्या. 1991, 1998 आणि 2004 मध्ये त्या तीनदा लोकसभेवर निवडून गेल्या.
 
1970-1972 - जनसंघ नेत्या, भाजप महिला आघाडी प्रमुख.
1974 नांदेड नगरपालिकेसाठी नांदेड काँग्रेसचे उमेदवार (8 वर्षे नगराध्यक्ष)
1980 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर हदगाव विधानसभेची निवडणूक जिंकली.
1980-1985 पर्यंत विधानसभा सदस्य)
1986 राजीव गांधी त्यांना राज्यसभेवर घेऊन गेले.
1991 मध्ये त्यांनी काँग्रेसकडून नांदेड लोकसभा विक्रमी 1 लाख 37 हजार मतांनी जिंकली.
1996 मध्ये हिंगोलीत काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवली आणि विजयी झाले.
1999 मध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला.
1998 मध्ये हिंगोलीत राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणूक लढवली आणि विजयी झाले.
2004 ला राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभा सदस्य.
2009 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून पराभव झाला
2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने राजीव सातव यांना हिंगोलीतून उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सोमवारी दुपारी त्या पुन्हा एकदा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रेमसंबंध, अपहरण, फॅनची हत्या आणि सुपरस्टारला अटक; सिनेमात नाही खरंच घडलेला गुन्हा