Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वंचित बहुजन आघाडीची विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ट्रान्सजेंडर उमेदवारचा समावेश

prakash ambedkar
, शनिवार, 21 सप्टेंबर 2024 (18:06 IST)
या वर्षाच्या अखेरीस महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.अद्याप तारखा जाहीर झाल्या नाही. राजकीय पक्षाने जागावाटप जाहीर केले नाही. 

वंचित बहुजन आघाडीने (VBA) शनिवारी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्याने आपल्या यादीत एका ट्रान्सजेंडरचाही समावेश केला आहे. मुंबईत पत्रकार परिषदेत व्हीबीएचे प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले की, लेवा पाटील समाजातील ट्रान्सजेंडर शमिभा पाटील उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील रावेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. सिंदखेड राजा मतदारसंघातून पक्षाने सविता मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

वंचित बहुजन आघाडीने राज्यातील विविध भागातील 11 उमेदवारांना तिकिटे दिली असून त्यात दलित, मागासवर्गीय, अल्पसंख्यांक आणि महिलांचा समावेश आहे. 

उमेदवारांची निवड करण्यात आली असून आमचा उद्देश्य सत्ता मिळवणे नसून अनेक वर्षांपासून उपेक्षित असलेल्या वंचित वर्गाचा आवाज बनने आहे. वंचित जनतेचा हक्क मिळवण्यासाठी आणि हक्काचे रक्षण करण्यासाठी आंम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहोत. असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.  
Edited By - Priya Dixit
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अतिशी ने दिल्लीच्या नववे मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ