Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 2 April 2025
webdunia

महाराष्ट्र बजेट: दुसरा दिवस

vidhan
, शुक्रवार, 4 मार्च 2022 (09:45 IST)
Maharashtra Budget Session 2022 : विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस राज्यपालांनी अभिभाषण दीड मिनिटांत गुंडाळल्यानं गाजला.  आजच्या दुसऱ्या दिवशी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या मुद्द्यांवर प्रत्त्युर देण्यासाठी भाजप नेते किरीट सौमय्या आणि केंद्रीय पथकांच्या वापरासह केंद्रातील घडामोडींवर सत्ताधारी विरोधकांना कोंडीत पकडण्याच्या तयारीत असणार आहेत. तर राज्यातील वीजेचा प्रश्न, ओबीसी आरक्षण, एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन यासह विविध मुद्यांवर विरोधकही सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात सर्वात महत्वाची बाब ठरणार आहे. ती म्हणजे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेतली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही याच अधिवेशनात निवडणूक होणार असं वक्तव्य केलं होतं. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक ही आवाजी पद्धतीनं व्हावी यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठा गदारोळ झाला होता. त्यामुळे या अधिवेशनात ही निवडणूक होणार का? आणि कशी होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.   
 
कालपासून सुरु झालेलं राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस. 3 मार्च ते 25 मार्च या कालावधीत महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडणार आहे. तर, 11 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याची तयारी केली आहे. तसेच, सत्ताधारीही विरोधकांना चोख प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहेत. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स अहवाल: YouTubers ने व्हिडिओंमधून देशासाठी 6800 कोटी कमावले, GDP मजबूत केला