Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

किल्ले मांगी तुंगी

किल्ले मांगी तुंगी

वेबदुनिया

PR
मांगी-तुंगी ही जैन लोकांची तीर्थक्षेत्रे.

गडावर जाण्याच्या वाटा :

मांगी-तुंगीला जायचे असल्यास नाशिक वरून सटाणामार्गेताहराबाद गाठावे. गुजरात मधून यायचे झाल्यास नीलमोरा रेल्वेस्थानकावरून अहुआ मार्गेताहराबाद गाठावे. ताहराबाद वरून भिलवाडी पर्यंत येण्यासाठी एस.टी. किंवा बससेवा उपलब्ध आहे. भिलवाडी हे मांगीतुंगीच्या पायथ्याचे गाव.भिलवाडीमध्येच जैनांची आदिनाथ,पार्श्र्वनाथ यांची मंदिरे आहेत. याला सुद्धा मांगी-तुंगीच म्हणतात. मांगी-तुंगी सुळक्यावर जाण्यासाठी गावातूनच रस्ता आहे. वीस मिनिटे रस्त्यावरून चालत गेल्यावर पुढे पायर्या लागतात. सुमारे २००० पायर्यांचा चढ चढून गेल्यावर आपण एका कमानीपाशी पोहोचतो. येथून डावीकडे गेलो तर मांगी आणि उजवीकडे गेलो की तुंगी.

राहण्याची सोय : गावात धर्मशाळा आहे. येथे १० ते १५जणांची राहण्याची सोय होते.

जेवणाची सोय : भिलवाडी गावात जेवणाची सोय होते..

पाण्याची सोय : गावातूनच पाणी घेणे आवश्यक कारण गडावर पाणी नाही.

जाण्यासाठी लागणारा वेळ : ३ तास पायथ्यापासून

Share this Story:

Follow Webdunia marathi