Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गणपतीपुळे

रूपेरी वाळूत माडांच्या बनात

गणपतीपुळे

मनोज पोलादे

गणपतीपुळेस प्रशस्त समुद्र किनारा लाभला आहे. हा संपूर्ण परिसर नारळ, केळी, आंबा या सारख्या फळझाडांनी समृद्ध आहे. दुरवर पसरलेला निळाशार समुद्र, किनार्‍यावरील नरम पांढररी तांबडी वाळू, समुद्रावरून वाहणारा प्रसन्न गार वारा ही सारी वैशिष्ट्ये पर्यटकांना साद घालतात.

Mh.govt
येथील निवांतपणा व शांतता हवीहवीशी वाटणारी आहे. निर्सगाचा कसल्याही व्यत्ययाव्यतिरिक्त आनद घ्यायचा तो येथेच. या ठिकाणाला धार्मिक महात्म्यही आहे. येथील गणपतीचे मंदिर प्रसिद्ध आहे. त्याच्या चरणी माथा टेकायला येतात.

निवांतपणे येथे मुक्कामाचा बेत असेल तर पर्यटन महामंडळाचे रिसॉर्टही आहे. गणपतीपुळेहून इतर ठिकाणी फिरण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत. येथे सृष्टीने भरभरून दाद दिले आहे. किनारपट्टी हिरव्या सौदर्याने नटलेली आहे.

गणपतीपूळे व भोवतालच्या परिसरात फिरतांना येथील तांबडी माती, मातीत मढलेल्या चिखली वाटा व सह्याद्रीच्या पायथ्याशी हा प्रदेश वसलेला असल्याने कोसळणारया पावसापासून रक्षणासाठी घरांची खास उतरती छप्परे सारे कसे कॅनव्हासवर काढलेल्या चित्राप्रमाणे वाटते.

गणपतीपुळेपासून जवळच दोन किलोमीटरवर कवी केशवसुतांचे मालगुंड हे गाव आहे. येथे त्यांचे स्मारकही उभारण्यात आले आहे.


जाण्याचा मार्ग :

रेल्वेने जायचे झाल्यास कोकण रेल्वेच्या प्रवासाचा आनंद घेत रत्नागिरीस पोहचायचे. रत्नागिरीहून येथील अंतर आहे 45 किलोमीटर. मुंबई ते गणपतीपूळे अंतर आहे 350 किलोमीटर. पुण्याहून 300 किलोमीटर. रत्नागिरीहून येथे सतत बसगाड्या असतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi