Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मालवण

मालवण

वेबदुनिया

PR
कोकण भूमीतील मालवण शहर हे एक आपल्या समृद्ध इतिहासाची साक्ष देणारं, आपल्या सुंदर समुद्र किनार्‍यानी आकर्षित करणारं आणि रसना पुर्तीला निमंत्रण देणारं शहर आहे. आपल्या चाकोरीबद्ध जीवनातील ताणतणावापासून मुक्त होण्यासाठी पर्यटन हा एक अनोखा मार्ग आहे. अशावेळी बहुतेक लोक सागर किनारी जाण्यास प्राधान्य देतात. सागराची भव्यता पहाताना हळूहळू आयुष्यातील सर्व कटकटींचा विसर पडून मन प्रसन्नतेने भरून जाते. हीच अनुभूती तुम्हाला मालवण येथील समुद्र ‍‍किनार्‍यावर येईल.

webdunia
PR
मालवणचा प्रसिद्ध चीवला बीच शहराच्या पूर्वेला आहे. चीवला बीच अगदी शहराला लागूनच आहे. मालवण शहरातून चीवला बीचला तुम्ही रिक्षाने किंवा भाड्याच्या सायकलने किंवा अगदी चालतही जाऊ शकता. एकदा तिथे पोचल्यावर फक्त समुद्र किनार्‍याची मौज लुटण्यावरच लक्ष केंद्रित करा.

मालवणच्या समुद्र किनार्‍यावर अद्यापतरी पर्यटकांनी तोबा गर्दी करून जत्रेचे स्वरूप आणलेले नाही. त्यामुळेच तुम्ही इथे मनशांती मिळण्याची अपेक्षा ठेऊ शकता. किनार्‍यावर अगदी अद्ययावत सुविधा नसल्या तरी निसर्ग
webdunia
PR
सानिध्याचा आनंद देणारी चांगली हॉटेल्स आहेत जिथे तुम्ही रासानापुर्तीचा आनंद मिळवू शकता. बहुतेक सर्वच हॉटेल्स मध्ये चांगली मच्छी जेवण मिळेल पण मालवण येथे खोताचे हॉटेल आणि मायेकाराची खानावळ एकेकाळी फारच लोकप्रिय होती. त्यामुळे त्यांना मुद्दाम भेट देणे कदाचित जास्त फायद्याचे ठरेल.



webdunia
PR
मालवण येथे पोहोचण्याचे मार्ग
विमानाने - 190 कि.मी. दाभोली-गोवा एअरपोर्ट
रेल्वेने - 45 कि.मी. कुडाळ रेल्वे स्टेशन
मोटरगाडीने -540 कि. मी. मुंबई पासून, 160 कि.मी. कोल्हापूरपासून 175 कि. मी. बेळगावपासून.

मालवण येथे काय पहाल
तारकर्लीतील थडकच्या कोंकणी झोपड्या (कोंकणी हट्स)
मालवणी जेवण आणि मालवणच्या खास मच्छी पाकक्रिया

Share this Story:

Follow Webdunia marathi