Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

किल्ले पेब

किल्ले पेब

वेबदुनिया

PR
माथेरानसारख्या सुंदर थंड हवेच्या ठिकाणी असलेल्या माणसांच्या गर्दीपासून मोकळीक हवी असल्यास निसर्गप्रेमींनी पेबचा किल्ला विसरू नये. एरवीदेखील एका दिवसाच्या ट्रेकसाठी 'पेब' सारखी जवळची आणि निसर्गरम्य जागा शोधून सापडणार नाही. किल्ला चढण्यासाठी लागणारा वेळ ,चढण्याची वाट ,वरील गुहेची रचना ,गुहेसमोरील निसर्गरम्य दृश्य अशा अनेक बाबतीत हा गड 'गोरखगडाशी' साधर्म्य साधतो. मात्र त्यामानाने हा किल्ला चढताना लागणारे जंगल घनदाट आहे. पेबच्या किल्ल्याचे विकटगड असे देखील नाव आहे.

इतिहास :

या किल्ल्याचे मूळ नाव पेब हे नाव पायथ्याच्या असलेल्या पेबी देवीवरून पडले असावे. किल्ल्यावरील गुहेचा शिवाजी महाराजांनी धान्य कोठारांसाठी उपयोग केला होता, असा स्पष्ट ऐतिहासिक संदर्भ पेबच्या किल्ल्याबाबत आढळतो.गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : पेबचा किल्ला चढताना वाटेत लागणारा धबधबा हे एक मोठे आकर्षण. किल्ल्यावरील गुहेसमोरून पावसाळ्यात सुंदर देखावा दिसतो. गुहे समोरून आपल्याला नवरा-नवरी,भटोबा असे सुळके दिसतात. या गडावर कोणत्याही
ऋतूत जाता येते.

पुढे पहा गडावर जाण्याचा वाटा


गडावर जाण्याच्या वाटा :

webdunia

PR


मध्य रेल्वेने कर्जतमार्गेनेरळ स्टेशनवर उतरल्यावर स्टेशनपासून थोडे बाहेर आल्यावर समोरच माथेरान आणि त्याच्या बाजूस पेबच्या किल्ल्याचे दर्शन होते. पेबला जाण्यासाठी नेरळ स्टेशनला उतरावे आणि उजवीकडची वाट पकडावी.
डावीकडची वाट आपणास माथेरानला घेऊन जाते. डोंगराच्या दिशेने जाताना मैदान,पोल्ट्रीफार्म,अर्धवट घरांची बांधकामे या काही खुणा सांगता येतील. त्यानंतर समोर दिसणा-या इलेक्ट्रिकच्या मोठमोठा टॉवरच्या दिशेने मार्गक्रमण करावे. सिमेंटचा एक मोठा पाया असलेला टॉवर आल्यावर तेथून थोडे पुढे गेल्यावर एक मोठा धबधबा लागतो. या धबधब्याजवळ आपल्याला तीन वाटा लागतात.

१) धबधब्याला लागून असलेली वाट.
२) मधून गेलेली मुख्य वाट.
३) टॉवर्सला लागून असलेली वाट.

webdunia
PR


या तीन वाटांपैकी मधली मुख्य वाट हीच किल्ल्याच्या गुहेपर्यंत नेणारी खरी वाट आहे.पहिल्या वाटेने पुढे गेल्यास जंगल लागते. पण पुढे या वाटेने जाणे अशक्यच आहे. तिसरी वाट म्हणजे मानेला वळसा घालून घास घेण्यासारखा प्रकार होय. तसेच या वाटेला पनवेलकडे जाणारे फाटे फुटत असल्याने वाट चुकण्याची शक्यता जास्त आहे. मधून जाणारी वाट पकडावी.

या वाटेने गणपतीचे चित्र काढलेला दगड येतो. या दगडाच्या उजव्या बाजूने वर चढावे. हीच वाट पुढे झ-याची होत असली तरी ही वाट न सोडता याच वाटेने खिंडीच्या दिशेने वाटचाल करावी. खिंडीत पोहोचल्यावर तेथून डाव्या हाताला वळून पुढे जावे.तेथून पुढे पांढरा दगड लागतो. पांढरा दगड चढण्यास अतिशय कठीण असून तो पार केल्यानंतर मात्र पुढे थोडाच अंतरावर गुहा लागते. प्रथमच जाणा-यांनी वाटाडया घेणे हितकारक आहे. किल्ला चढण्यास लागणारा वेळ दोन ते अडीच तास आहे. पेबवर जाण्यासाठी गिर्यारोहकांना आणखी एक वाट आहे. त्यासाठी माथेरानच्या पॅनोरमा पॉईंटवर यावे. येथून सुमारे ६ तासात पेबच्या गुहेत पोहचता येते. गुहांच्या पायथ्याशी गरुड कोरला आहे.

राहण्याची सोय :

webdunia

PR


किल्ल्यावर गुहेमध्ये स्वामी समर्थांचे शिष्यगण रहात असल्याने गुहेच्या बाहेर किंवा जवळच असलेल्या कपारीमध्ये १० जणांच्या रहाण्याची सोय होते. गुहेजवळच असलेली पाण्याची टाके हीच पिण्याच्या पाण्याची सोय.

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi