Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पन्हाळगडावर जाताय ना...

पन्हाळगडावर जाताय ना...
MH GovtMH GOVT
महाराष्ट्राच्या इतिहासात शिवरायांचा सिंहाचा वाटा आहे. शिवरायांच्या शिवरायांच्या जीवनातील नाट्यपूर्ण घटनांचे कथन करणारा किल्ला म्हणून पन्हाळगडाकडे पाहिले जाते. किल्ल्याची उंची ही सुमारे ४०४० फूट आहे. पन्हाळगड हा महाराष्ट्रातील किल्ल्याच्या तुलनेत अधिक उंचावर असल्याने भारत तसेच विदेशातील पर्यटक येथे भेट देत असतात.

शिलाहार भोज राजा नृसिंह याच्या कारकिर्दीत हा किल्ला बांधण्यात आला होता. सुरवातीला हा किल्ला पूर्वी नाग जमातीतील लोकांच्या ताब्यात होता. 'पन्नग्रालय' या नावाने हा क‍िल्ला पूर्वी ओळखला जात होता. अफजलखानच्या वधानंरत अवघ्या १८ दिवसातच शिवरायांनी हा किल्ला ताब्यात घेतला. 1700 शतकात पन्हाळा ही कोल्हापूरची राजधानी झाली परंतु अठराशेमध्ये किल्ला ब्रिटीशांच्या ताब्यात गेला होता. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पन्हाळगड ब्रिटीशांच्या तावडीतून सहीसलामत सुटला.

गडावरील पहाण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. की, ते पाहण्यासाठी दरवर्षी हजारोंच्या संख्येने पर्यटक येथे येत असतात. मुंबई- पुणेकराची तर विकेंड येथे गर्दी होत असते. भिजपावसात पन्हाळगडावर जाण्‍याची मजा काही ओरच असते.
webdunia
MH GovtMH GOVT

* राजवाडा-
पन्हाळगडावरील ताराबाईंचा राजवाडा प्रेक्षणीय असून त्यात असलेली प्राचीण देवघरं ही अतिशय देखणी आहेत. सध्या या वाड्यात नगरपालिका कार्यालय व पन्हाळा हायस्कूलच्या मुलांचे वसतीगृह आहे.
* सज्जाकोठ-
शिवरायांच्या गृप्त वार्ताचा साक्षीदार असलेला कोठीवजा इमारत म्हणजेच सज्जाकोठ. संभाजी राजे येथून संपूर्ण प्रांताचा कारभार पाहत होते.
* राजदिंडी-
राजदिंडी नामक एक या गडावरील दूर्गम वाट आहे. या वाटेनेच शिवराय सिध्दी जौहरला चकवून विशालगडावर पसार झाले होते.
* अंबारखाना-
अंबारखाना हा त्या काळचा भांडार होय. येथे गंगा, यमुना व सरस्वती अशी तीन धान्य कोठारे आहेत. त्यात वरी, नागली आणि भात भरला जात होता.
webdunia
MH GovtMH GOVT
* चार दरवाजा-
चार दरवाजा हा पन्हाळगडा वरील मोक्याचा व महत्त्वाचा दरवाजा होता. येथे शिवा ‍काशिद यांचा पुतळा आहे. किल्ला इंग्रजांच्या ताब्यात होता तेव्हा त्यांनी तो पाडून टाकला होता. त्याचे अवशेष अजून येथे आहे.
* संभाजी मंदिर-
गडावर एक छोटी गडी व दरवाजा असून तेथे संभाजी मंदिर आहे. मंदिर परिसर विलोभनीय आहे.
* महालक्ष्मी मंदिर-
राजवाडातून बाहेर पडल्यावर नेहरू उद्यानाच्या खालच्या बाजूस 1000 वर्ष पुरातन महालक्ष्मी मंदिर आहे. भोज राजाचे कुळदैवत होते, असे म्हणतात.
* तीन दरवाजा-
पन्हाळगडवरील पश्चिमेला असलेला हा दरवाजा. दरवाज्यावरील नक्षीकाम अतिशय प्रेक्षणीय आहे.
* बाजीप्रभुंचा पुतळा-
एस टी स्थानकावरून थोडे पुढे गेले असता वीररत्‍न बाजीप्रभु देशपांडे यांचा आवेशपूर्ण पुतळा दृष्‍टीस पडतो.

कसे पोहचाल?
पन्हाळगडावर जाण्‍यासाठी सगळयात जवळचे रेल्वेस्थानक, बसस्थानक कोल्हापूर येथे आहे. चार दरवाजा व तीन दरवाजामार्गे किल्ल्यावर जाता येते.

कोल्हापूर येथून पन्हाळगड 45 किमी अंतरावर असून एसटी व खाजगी वाहन सहज उपलब्ध होते. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसेस थेट गडावर सोडतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi