Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

माझा महाराष्ट्र : महाबळेश्वर

महाराष्ट्राचे काश्मीर

माझा महाराष्ट्र : महाबळेश्वर

वेबदुनिया

PR
महाराष्ट्रातील काश्मीर असे महाबळेश्वरचे वर्णन केले जाते. सातारा‍ जिल्ह्यात महाबळेश्वर सह्याद्रीच्या कुशीत वसले आहे. निसर्गरम्य व थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वरचा लौकिक आहे. महाबळेश्वर इंग्रजांच्या काळात मुंबई प्रांताची उन्हाळ्यातील राजधानी होते.

येथे सुमारे 30 ठिकाणे बघण्यासारखी आहेत.एलफिस्टन पॉईट, विल्सन पॉईंट, आर्थर पाईंट, लॉडनिंग पॉईंट, माजोरी पॉईंट नाथकोट, बॉंम्बे पाईंट, सावित्री पाईंट कर्निक पाईंट फाकलेड पॉईंट हे काही पॉईंट प्रसिद्ध आहेत.

या पॉईंटवर जाऊन सूर्यास्त पाहण्याची मजा काही वेगळीच.महाबळेश्वरचे पठार जवळपास 150 किलोमीटरमध्ये व्यापले आहे. समुद्रसपाटीपासून ते 4710 फुट उंचीवर आहे. येथे पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत असतात.

महाबळेश्वर हे धार्मिक क्षेत्र म्हणूनही प्रसिध्द आहे. शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा काढला तो प्रतापगड येथून जवळ आहे. पाचगणी हे आणखी एक थंड हवेचे ठिकाणही पाहण्यासारखे असून तेही येथून जवळ आहे. महाबळेश्वर येथील स्ट्रॉबेरीही जगप्रसिध्द आहे. थंडीत स्ट्रॉबेरी खाण्याचा आनंद काही औरच आहे.

जाण्याचा मार्ग - महाबळेश्वर पुण्यापासून 120, मुंबईहून 247 औरंगाबादहून 348 तर पणजी पासून 430 किलोमीटरवर आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi