Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रामटेक

रामटेक
नागपूरच्या ईशान्येस रामगिरी नावाच्या टेकड्यांच्या कुशीत रामटेक हे पर्यटनस्थळ आहे. अगत्स्य ऋषीं येथे वास्तव्यास असतांना भगवान श्रीरामांनी त्यांच्या आश्रमास भेट दिल्याचा पुराणात उल्लेख आहे. म्हणून या परिसरास रामगिरी व त्याचाच अपभ्रंश म्हणून रामटेक असे म्हटले जाते. रामगिरीवर ब्राम्हणिक शैलीतील सत्तावीस मंदिरे आहेत. चौदाव्या शतकातील लक्ष्मण मंदिर त्यातीलच एक. दरवर्षी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात येथे भव्य यात्रा भरते. प्रभू रामचंद्रांचे सहाशे वर्षांपूर्वीचे मंदिर येथे आहे. प्राचीन काळी विदर्भातील वाकाटक साम्राज्यात रामटेकचा समावेश होता.

कवी कालिदासास 'मेघदूत' हे महाकाव्य लिहिण्याची प्रेरणा येथील अद्वितीय सौदर्यानेच दिली. कालिदासाच्या या स्मृती जपाव्यात म्हणूनच येथे संस्कृत विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. रामगिरीच्या परिसरात सृष्टीसौदर्य ओसंडून वाहते. येथील हवामानही आल्हाददायक आहे. अनेक ऋषी, मुनींनी येथे तपश्चर्या करून ज्ञानप्राप्ती केली आहे. महानुभाव पंथाच्या चक्रधरस्वामींनी ज्ञानप्राप्तीसाठी येथेच तपस्या केली होती. सुमारे सहाशे वर्षापूर्वी ते येथे वास्तव्यास होते.

रामटेक अध्यात्मिक केंद्रासोबतच पर्यटनस्थळ म्हणूनही प्रसिद्ध आहे. 'हम आपके है कौन' या चित्रपटाचे चित्रिकरण याच परिसरात झाले आहे. विशेषतः त्यातील वाह वाह रामजी जोडी क्या बनायी...हे गाणे या पार्श्वभूमीवर चित्रित केले आहे. येथील तोतलाडोह धबधबा पावसाळ्यात पर्यटकांनी ओसंडून वाहत असतो. खिंडशी तळेही पर्यटकांना साद घालत असते.

जाण्याचा मार्ग :

रामटेक विमान, रेल्वे व रस्त्यांनी जोडलेले आहे. नागपूर विमानतळावरून रामटेक अठ्ठावन्न किलोमीटरवर आहे. रेल्वेने जायचे झाल्यास नागपूरहून नियमित गाड्या आहेत. नागपूर येथून बसही उपलब्ध आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi