नौका विहारासाठी बोटींची व्यवस्थाही आहे. जंगलात मूक्त भटकतांना ह्या परीसराची ओळख व वैशिष्ट्य असणारे दगड व खडकही आपल्याशी मैत्रीचे नाते जोडते. चौकस व अभ्यासू पर्यटकांना येथील दगड व खडकातही मित्र भेटल्यास नवल वाटू नये. ह्या परिसरातच नागार्जून हे तीर्थस्थळही आहे. परिसरातील गोरखनाथ मंदिरात महाशिवरात्रीस भव्य यात्रा भरते. जिल्हत्या्तल्या भाविकांसोबतच मध्यप्रदेश व गुजरातमधील गावातुनही हजारो भाविक अनवाणी चालत गोरखनाथाच्या चरणी माथा टेकवण्यासाठी येतात. गुफाचे दर्शनही घडते. मच्छिद्रनाथ गुफा त्यापैकीच एक. परिसरात निर्सगाशी संवाद साधायला आलेला पर्यटक दोन घटका थांबुन श्रद्धेने नागार्जूनाचे दर्शन घेते. जैविक व नैसर्गिक विविधता जोपासणार्या सातपुड्याच्या तोरणमाळ रांगात मनोहारी दृश्यांचे दर्शन घडविणारे नागार्जून, खडकी, आमदरी व सनसेट पॉईंट ही पर्यटकांची विशेष आकर्षण केंद्रे आहेत. निसर्गाच्या उपासकांसोबतच साहसी पर्यटकांना हे पॉईंट खुणावतात. साहसास प्रोत्साहन देणार्या ह्या पॉईंटवरून दिसणार्या दर्यांच्या खोलीत झाकायचा प्रयत्न केल्यास हृदयास धाप लागते. सातपुड्यातील हे कडे ट्रेकर्सना आव्हान करतात.
अनं ट्रेकर्सही आव्हानाचा स्विकार करत कड्यांच्या अंगाखाद्यावर खुशाल बाळगतात. तोरणमाळच्या उंचच-उंच कपारींवरून दुरवर दृष्टी टाकल्यास निर्सगाच्या अविष्कारासोबतच ह्या निसर्गरम्य परिसरातील पारंपारिक वास्तव्य करणार्या आदिवासी बांधवांच्या वस्त्यांवरही नजर खिळते. आदिवासी संस्कृतीही येथे जवळून न्याहाळता येते. तोरणमाळला एका दिवसाची धावती भेट तर देता येतेच मात्र, ह्या भागातील इतिहास, भूगोल व संस्कृती समजून घ्यायची झाल्यास मुक्कामासाठी महाराष्ट्र पर्यटन महामंडळ व वन विभागाच्या विश्रांतीगृहात मुक्कामही ठोकता येते.
जाण्याचा मार्ग : तोरणमाळला पोहचण्यासाठी आधी धुळे गाठायचे. नंदुरबारही रेल्वेने जोडले आहे. धुळे रेल्वे व महामार्गाने राज्यातील प्रमुख शहरांशी जोडलेले आहे. एकदाचे धुळे जवस केले की तोरणमाळला जाण्यासाठी बससेवा उपलब्ध आहे. विमानाने जायचे झाल्यास औरंगाबाद हे जवळचे विमानतळ आहे.