Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हिरव्यागार सौदर्याने नटलेला ‍समुद्रकिनारा : तारकर्ली बीच

हिरव्यागार सौदर्याने नटलेला ‍समुद्रकिनारा : तारकर्ली बीच

वेबदुनिया

WD
विस्तीर्ण पसरलेला समुद्रकिनारा, पायांना कोमल स्पर्श करणारी मऊ वाळू, कोवळे उन. स्वर्ग यापेक्षा काही वेगळा असतो काय? तारकर्ली किनार्‍यावर गेल्यानंतर या स्वर्गाचा अनुभव येतो. अतिशय सुंदर असा समुद्रकिनारा, बांबूची, सुपारीची झाडे पाहून मन प्रसन्न होते.

बाधा व्हावी असे सौंदर्य निसर्गाने येथे उधळले आहे. येथे थांबून निसर्गाचा आनंद घेण्यासाठी रिसॉर्ट आपल्या सेवेत हजर आहेत. येथील समुद्र किनारे एवढे नितळ, स्वच्छ आहेत की पाण्यातील सौदर्य अगदी साध्या डोळ्यांनी न्याहाळता येते.

निळेशार पाणी आणि क्षितिजापर्यंत पसरलेला किनारा रोजच्या ताणतणावापासून दूर ठेवतो. मनाला शांतावतो. गर्दीपासून दूर शांत, निवांत क्षण घालवण्यासाठी हे ठिकाण नक्की भेट देण्यासारखे आहे.

जाण्याचा मार्ग : मालवणपासून तारकर्ली केवळ सहा किलोमीटर आहे. पुणे, कोल्हापूर, मालवण येथून बसची व्यवस्था आहे. मुंबईपासून साडेपाचशे तर कोल्हापूरपासून हे ठिकाण दीडशे किलोमीटरवर आहे.तारकार्लीसाठी जवळचे रेल्वे स्टेशन आहे

कुडाळ. तेथून येथे येण्यासाठी बस उपलब्ध असतात. तारकर्लीला विमानाने जाण्यासाठी गोव्यातील डाबोलीम हे जवळचे विमानतळ आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi