Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'बिबी'का मकबरा

'बिबी'का मकबरा

वेबदुनिया

WD
ताज महल हा ऐक भव्यदिव्य मकबरा एका प्रेमी नवर्‍याने (शहजहान)आपल्या बायकोवरच्या (मुमताज)प्रेमाखातर बनवला होता. त्याती प्रतिकृती असलेला आणि त्याच्या रचनेवर बेतलेला औरंगाबाद येथील 'बिबी का मकबरा' मात्र एका मुलाने त्याच्या आईच्या स्मरणार्थ बांधलेला मकबरा आहे.

औरंगजेबाचा मुलगा आजमशहा याने त्याची आई, रबिया दुर्राणी उर्फ दिलरस-बानू-बेगम हीच्या स्मरणार्थ हा मकबरा बांधला. खरंतर आजमशहाला हे स्मारक ताज महलपेक्षाही भव्यदिव्य बनवायचे होते पण औरंगजेबाने दिलेल्या 'बजेट'मध्ये ते शक्य झाले नाही. पण ह्या कलाकृतीची नेहमी ताज महल बरोबर तुलना झाल्यामुळे आणि ताज महल इतके भव्यदिव्य नसल्यामुळे जरा दुर्लक्षीत होउन तेवढी लोकप्रियता नाही मिळाली. ह्या 'बिबी का मकबर्‍या'ला 'दख्खनी ताज' असेही म्हटले जाते.

Share this Story:

Follow Webdunia marathi