महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट आहे. अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिरासाठी प्रसिद्ध आहे.सोलापुरातून आलेले स्वामी समर्थ यांनी अक्कलकोटला वास्तव्य केले. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुका हे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर आहे. आजही स्वामी समर्थांचे अस्तित्व येथे असल्याचे भाविकांना जाणवते. भाविकांच्या मनोकामना स्वामी पूर्ण करतात असा भाविकांचा विश्वास आणि तशी श्रद्धा आहे.भाविकांची येथे प्रचंड गर्दी असते. पुर्वीचे प्रज्ञापूर हे नाव असलेले गाव स्वामींच्या आगमनाने अक्कलकोट बनले.अक्कलकोट येथे एक भव्य स्वामी मंदिर आहे. श्रीच्या पादुका, शिवलिंग, स्वामींच्या स्मृती वस्तु, प्रवचन हॉल छोटीशी भक्त निवास व्यवस्थाही आहे.
स्वामींनी या ठिकाणी अनेक चमत्कार केले आहे. या परिसरात एका वटवृक्षाच्या खाली स्वामींच्या पादुका आहेत ज्याला कान लावल्यावर वाद्यांचे आवाज येतात असा अनुभव भाविकांना येतो. वटवृक्ष मंदिरात सकाळी अभिषेक, रुद्रपठण सुरु असते. या परिसरात मारुतीचे मंदिर आणि शिवाचे पिंड आहे. या परिसराच्या जवळ संस्थानचे ऑफिस आहे. मंदिराच्या परिसरात पोहोचल्यावर स्वामींची शांतमूर्ती पाहिल्यावर मन हरवून जात. सर्व दुःख कष्ट नाहीसे होतात.
अक्कलकोट स्थानाचे महत्त्व -
या अक्कलकोट तीर्थस्थानी स्वामींनी अनेक चमत्कार लोकांना दाखवले आहे. ज्यांनी आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्ष हे चमत्कार पहिले आहे.खरोखर ते खूप धन्य आहे. स्वामीं दीनांचे कैवारी असून सर्व गुण संपन्न सर्व काही करण्यास आपल्या नावाप्रमाणे समर्थ ज्यांना काहीही अशक्य नाही. अशक्य ही शक्य करणारे स्वामींचे अक्कलकोट हे मुक्तीचे माहेरघर आहे.अक्कलकोट येणारा प्रत्येक भाविकाला अगदी सहज पद्धतीने मुक्ती देणाऱ्या अक्कलकोट किंवा अमरकोट एकदा तरी जावे.
कसे जायचे -
अक्कलकोट ज्यासाठी सोलापूरापासून जाण्यासाठी नियमीत बस सेवा आहे. अक्कलकोट सोलापूर पासून सुमारे 35 किमी अंतरावर आहे.