Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भक्तवत्सल व प्रेमळ गणपती श्री बल्लाळेश्वर, भक्ताच्या नावावरून गणेशाचं नाव

Shri-Ballaleshwar-pali
, मंगळवार, 26 ऑगस्ट 2025 (07:30 IST)
Maharashtra Tourism : महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील पाली गावात श्री बल्लाळेश्वर हे गणपतीचे मंदिर आहे. हे मंदिर अष्टविनायकांपैकी एक मानले जाते, जे गणपतीच्या आठ पवित्र तीर्थस्थानांपैकी तिसरे आहे.
 
वैशिष्ट्ये-  
अष्टविनायकांमध्ये हे एकमेव मंदिर आहे जे गणपतीच्या भक्ताच्या नावाने (बल्लाळ) ओळखले जाते. बल्लाळ हा गणपतीचा परम भक्त होता, आणि त्याच्या भक्तीमुळे गणपतीने येथे "बल्लाळ विनायक" या नावाने कायमचे वास्तव्य करण्याचे वरदान दिले.
 
मूर्ती आणि रचना-
मंदिरातील गणपतीची मूर्ती ३ फूट उंच, स्वयंभू आणि पूर्वाभिमुख आहे. गणपतीची सोंड डावीकडे वळलेली आहे, आणि मूर्तीचे डोळे व नाभी हिऱ्यांनी जडलेले आहे. तसेच मंदिर दगडी असून, त्याची रचना अशी आहे की सूर्योदयावेळी सूर्यकिरण थेट मूर्तीवर पडतात. मंदिराच्या परिसरात दोन तलाव आहे, त्यापैकी एकाचे पाणी पूजेसाठी वापरले जाते. मंदिराची रचना "श्री" या अक्षराच्या आकारात आहे. तसेच मूळ मंदिर लाकडी होते, ज्याचे १७६० मध्ये नाना फडणवीस यांनी दगडी मंदिरात रूपांतर केले. मंदिरात चिमाजी अप्पा यांनी भेट दिलेली पितळी घंटा आहे.
 
पौराणिक कथा-
विश्वामित्र ऋषींनी भीमराजास, भृगु ऋषींनी सोमकांत राजास श्री बल्लाळेश्वराची कथा सांगितली असा उल्लेख आहे. तर मुद्गल पुराणात जाजलीने विभांडक ऋषींना श्री बल्लाळविनायकाची कथा सांगितल्याचा उल्लेख आहे. फार प्राचीन काळी, म्हणजे कृतयुगात सिंधू देशातील कोकण पल्लीर नावाच्या गावात कल्याण नावाचा एक व्यापारी राहात होता. त्याच्या पत्नीचे नाव इंदुमती. काही दिवसांनी त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव बल्लाळ. बल्लाळ जसजसा मोठा होऊ लागला, तसतसा त्याचा गणेशमूर्तिपूजनाकडे अधिक ओढा दिसू लागला. हळूहळू तो गणेशचिंतनात रमू लागला. त्याच्या मित्रांनाही गणेशभक्तीचे वेड लागले. बल्लाळ आपल्या मित्रांसह रानात जाऊन गणेशमूर्तीचे भजन-पूजन करू लागला. बल्लाळाच्या संगतीने मुले बिघडली अशी ओरड गावात सुरु झाली. लोक कल्याण शेठ्जीकडे जाऊन 'बल्लाळने आमच्या मुलांना बिघडविले' अशी तक्रार करू लागले. थोड्या वेळाने बल्लाळ भानावर आला. त्याचे शरीर ठणकत होते. तशाच स्थितीत त्याने गणेशाचा धावा केला. ''हे देवा, तू विघ्ननाशक आहेस. तू आपल्या भक्ताची कधीही उपेक्षा करीत नाहीस… ज्याने गणेशमूर्ती फेकली व मला मारले तो आंधळा, बहिरा, मुका व कुष्ठरोगी होईल. आता तुझे चिंतन करीतच मी देहत्याग करीन.' आपला मुलगा इतक्या लहान वयात भक्तिमार्गाला लागला आणि त्याने आपल्याबरोबर इतर मुलांनाही वाईट नादाला लावले या विचाराने कल्याण शेठजींना राग आला. त्या रागाच्या भरातच तो एक भलामोठा सोटा घेऊन बल्लाळ ज्या रानात होता तेथे गेला. तेथे बल्लाळ आपल्या सवंगड्यांसह गणेशमूर्तीची पूजा करीत होता. सारेजण गणेशाचे भजन करीत होते. बल्लाळ गणेशाच्या ध्यानात अगदी रंगून गेला होता. ते पाहून कल्याण शेठजींच्या पायाची आग मस्तकाला गेली. तो ओरडत, शिव्या देतच तेथे धावला. त्याने ती पूजा मोडून टाकली. गणेशाची मूर्ती फेकून दिली. इतर मुले भीतीने पळून गेली; पण बल्लाळ मात्र गणेश ध्यानात मग्न होता. कल्याण शेठजीने बल्लाळास सोट्याने झोडपून काढले. बल्लाळ रक्तबंबाळ झाला, बेशुद्ध पडला; पण कल्याणला त्याची दया आली नाही. त्याने बल्लाळाला तशा अवस्थेच एका झाडाला वेलींनी बांधून ठेवले. कल्याण शेठ रागाने म्हणाला, 'येऊ दे तुझा गणेश आता तुला सोडवायला. घरी आलास तर ठार मारीन, तुझा नि माझा संबंध कायमचा तुटला.' असे म्हणून कल्याण शेठ निघून गेला.बल्लाळाचा धावा ऐकून विनायक-गणेश ब्राह्मण रुपात प्रगट झाला. बल्लाळाचे बंध तुटले. त्याचे शरीर होते तसे सुंदर झाले. गणेश बल्लाळाला म्हणाला, ''तुला ज्याने त्रास दिला त्याला याच जन्मी नव्हे तर पुढच्या जन्मीसुद्धा अपार दुःख भोगावे लागेल. तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. तू माझ्या भक्तीचा प्रवर्तक, श्रेष्ठ आचार्य व दीर्घायुषी होशील. आता तुला हवा तो वर माग.'' तेव्हा बल्लाळ म्हणाला – ''तू याच ठिकाणी कायमचे वास्तव्य करावेस व आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण कराव्यात. ही भूमी गणेश क्षेत्र म्हणून प्रसिद्ध व्हावी.'' तेव्हा गणेश म्हणाला – ''तुझ्या इच्छेनुसार मी इथे 'बल्लाळ विनायक' या नावाने कायमचे वास्तव्य करीन. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला जे भक्त येथे येतील त्यांच्या सर्व मनःकामना पूर्ण होतील.'' असा वर देऊन गणेश जवळ असलेल्या एका शिळेत अंतर्धान पावला. तीच शिळा आज बल्लाळेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे.
उत्सव- 
गणेश चतुर्थी आणि गणेश जयंती या काळात मंदिरात मोठ्या उत्साहाने उत्सव साजरे होतात. गणेश चतुर्थीला महानैवेद्य आणि पंचमीला दहीकाल्याचा नैवेद्य अर्पण केला जातो.
 
श्री बल्लाळेश्वर मंदिर पाली जावे कसे? 
रायगड जिल्हा अनेक प्रमुख मार्गांना जोडलेला आहे. तसेच श्री बल्लाळेश्वर मंदिर खोपोलीपासून ३० किमी अंतरावर आहे.
ALSO READ: ज्ञान व बुद्धीचा अधिपती मोरगावचा मोरेश्वर, महादेवांचा नंदी इथं मयूरेश्वराच्या मंदिराबाहेर

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नेहा धुपियाचा मोठा खुलासा; लग्नापूर्वी गरोदरपणावर उपस्थित झालेल्या प्रश्नांना दिले समर्पक उत्तर