Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ट्रेकर्सना खुणावणारा दूधसागर धबधबा

ट्रेकर्सना खुणावणारा दूधसागर धबधबा
कॅसलरॉक ते दूधसागर धबधबा हा एक महत्त्वाचा ट्रेकिंग रूट आहे. आपल्या परिसरातील बहुतेक ट्रेकर्सना खुणावणरा, रोमांचक मात्र तरीही धोकादायक नसलेला असा हा ट्रेक आहे. दूधसागर धबधबा जेथे संपतो तेथपर्यंत पोहचण्याचे थ्रील नक्कीच  वेगळे असते. बेळगाव ते गोवा रोडवर चार किलोमीटर आत अनमोड घाटातून कॅसलरॉक रेल्वे स्टेशनला जायचे. तेथून रेल्वेने किंवा चालत 14 किलोमीटरवरील दूधसागर धबधब्याला जाता येते.

दूधसागर धबधब्यापासून पुढे चार किलोमीटरवर सोनोलीन गाव आहे. या ठीकाणी फक्त एकच घर आहे. तेथून चार किलोमीटरचा रस्ता पूर्ण मातीचा आहे. त्यावरून चालत जेथे दूधसागर धबधबा संपतो तेथे पोहचतो. हाच दूधसागर ट्रेक होय. कॅसलरॉअक येथून एकूण 22 किलोमिटरचा हा ट्रेक आहे. रेल्वेस्टेशन आळविळ आणि अतिप्रचंड असलेला हा धबधब जेते संपतो ते ठिकाण पाहण्याची मजा आणि थ्रिल वेगळे असते. सोनोलीन गावातून चार किलोमीटरचा रस्ता मातीचा असल्याने त्यावरच चांगली दमछाक होते, तेथून परत दूधसागर येथे येऊन मुक्कामही करू शकतो. येथे कँटीन आहे. तसेच टेंट लावण्यासाठी जागाही आहे. परत यायचे झाले तरीही शक्य होते. कोल्हापूर शहरातून आपण पहाटे चार वाजता निघालो तर सकाळी साडे सहा वजेपर्यंत कॅसलरॉकपर्यंत पोहचता येते. दुपारपर्यंत ट्रेक संपवून सायंकाळी कॅसलरॉकवर परत येता येते. त्यामुळे रात्री कोल्हापुरात पोहचता येते.

webdunia

'चेन्नई एक्सप्रेस' मध्ये दाखवलेला नितांत सुंदर धबधबा म्हणजे कॅसलरॉकजवळील दूधसागर होय. या दूधसागरला रेल्वे ट्रॅकवरून कसे जायचे याची माहिती सर्वानाच असते असे नाही. पावसाळ्यात बहुतेक ट्रेकर्स रेल्वे ट्रॅकवरून दूधसागरपर्यत जातात. पण थंडीत हा ट्रॅक करायचा असेल तर रेल्वे ट्रॅक आणि टनेलमधून थोडे पुढे जावे लागतो. दूधसागर जेथे संपतो तेथेही जाता येते. सकाळी लवकर उठून बाहेर पडले तर एका दिवसात हा रोमांचकारी ट्रेक पूर्ण करता येतो..

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘सत्यमेव जयते' अमृता खानविलकरचा पुढचा हिंदी सिनेमा