rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Famous Sai Baba Temples महाराष्ट्रातील प्रसिद्ध साई बाबा मंदिरे

saibaba
, शुक्रवार, 28 नोव्हेंबर 2025 (07:30 IST)
Maharashtra Tourism : साई बाबा हे महाराष्ट्रातील प्रमुख संतांपैकी एक होते ते खूप दयाळू होते भक्त त्यांना प्रेमाने साई म्हणायचे तसेच अनेक भक्त साई बाबांचे पारायण देखील करतात तसेच गुरुवार हा साईबाबांचा विशेष दिवस मानला जातो, या दिवशी साई बाबांच्या सर्वत्र मंदिरात विशेष पूजा, कीर्तन, महाप्रसाद आणि आरती होतात. 
महाराष्ट्रामध्ये शिर्डी साई बाबांचे मुख्य समाधी मंदिर आहे हे महाराष्ट्रामध्ये साईबाबांचे सर्वात प्रसिद्ध आणि मुख्य मंदिर अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे आहे. शिर्डी व्यतिरिक्त, महाराष्ट्रात साईबाबांची इतर अनेक मंदिरे आहे, जी भक्तांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. तर चला आज आपण पाहू या महाराष्ट्रातील प्रमुख आणि प्रसिद्ध साईबाबा मंदिरे जिथे तुम्ही नक्कीच भेट देऊ शकतात 
 
श्री साईबाबा मंदिर क्षेत्र शिर्डी मुख्य समाधी मंदिर
श्री साईबाबा मंदिर क्षेत्र शिर्डी मुख्य समाधी मंदिर हे  अहमदनगर जिल्ह्यात म्हणजेच अहिल्यानगर मध्ये आहे हे केवळ महाराष्ट्रातीलच नाही, तर जगातील सर्वात प्रसिद्ध साईबाबा मंदिर आहे. येथे साईबाबांची समाधी आहे. येथे बाबांच्या समाधीवर त्यांची संगमरवरी मूर्ती स्थापित आहे. तसेच मंदिरात असलेली द्वारकामाई हे ठिकाण बाबांचे निवासस्थान आणि दरबार होते, जिथे ते 'धुनी' पेटवत असत. येथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात आणि रामनवमी, गुरुपौर्णिमा तसेच विजयादशमी हे प्रमुख उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होतात.
 
श्री साईबाबा मंदिर पाथरी
श्री साईबाबा मंदिर हे प्रसिद्ध मंदिर पाथरी जिल्हा परभणी मध्ये आहे  अनेक भक्तांच्या आणि संशोधकांच्या मते, पाथरी हे साईबाबांचे जन्मस्थान आहे. येथे असलेले मंदिर बाबांच्या मूळ निवासस्थानाचे प्रतीक मानले जाते आणि भक्तांमध्ये या स्थानाला विशेष आदर आहे.
 
'प्रति-शिर्डी' शिरगाव
'प्रति-शिर्डी' म्हणून ओळखले जाणारे बाबांचे मंदिर शिरगाव जे सोमाटणे फाटा, पुणे-मुंबई महामार्गाजवळ असून पुणे जिल्ह्यात येते हे मंदिर शिर्डीच्या मंदिराप्रमाणेच भव्य आणि सुंदररित्या बांधले गेले आहे. ज्या भक्तांना नेहमी शिर्डीला जाणे शक्य नसते, त्यांच्यासाठी हे ठिकाण 'प्रति-शिर्डी' म्हणून ओळखले जाते.
 
कोकणची शिर्डी कविलगाव
सिंधुदुर्ग जिल्हयात असलेले कविलगाव मधील साई बाबांचे मंदिर हे अतिशय प्रसिद्ध आहे काही माहितीनुसार, हे भारतातील पहिले साई मंदिर मानले जाते. या क्षेत्राला 'कोकणची शिर्डी' असेही म्हणतात.
 
श्री साईबाबा मंदिर शिंगणापूर  
अहमद नगर जिल्ह्यातील शिर्डीपासून जवळच असलेले शिंगणापूर येथे साई यांचे अतिशय प्रसिद्ध मंदिर आहे.येथील साईबाबांची मूर्ती खुल्या आकाशाखाली आहे, आणि गावात चोरी होत नाही अशी श्रद्धा आहे.
 
श्री साईबाबा मंदिर कोपरगाव
अहमदनगर जिल्ह्यात शिर्डीला जाणाऱ्या मार्गावर कोपरगाव मध्ये असलेले साई बाबा मंदिर जुने आणि प्रसिद्ध मंदिर आहे. 
 
मुंबई-पुण्यातील प्रमुख मंदिरे
मुंबई आणि पुणे यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये साईबाबांची अनेक भव्य मंदिरे आहे, जिथे दररोज हजारो भक्त दर्शनासाठी जातात 
साईबाबा मंदिर, जुन्नर पुणे-जुन्नर तालुक्यातील हे एक मोठे साई मंदिर आहे.
साईबाबा मंदिर, खार मुंबई-मुंबईतील भक्तांसाठी हे एक प्रमुख आणि प्रसिद्ध मंदिर आहे.
या व्यतिरिक्त महाराष्ट्रातील जवळजवळ प्रत्येक शहरात, गावात आणि वस्त्यांमध्ये साईबाबांचे छोटे-मोठे मंदिर आहे. गुरुवार हा साईबाबांचा विशेष दिवस मानला जातो, त्या दिवशी सर्वत्र विशेष पूजा, कीर्तन, महाप्रसाद आणि आरती होतात.या सर्व मंदिरांमध्ये गुरुवार हा दिवस साईबाबांचा वार म्हणून विशेष उत्साहाने पाळला जातो. 
ALSO READ: भारतीय मंदिरांतील वैज्ञानिक रहस्य

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कॅनडा कॅफेमध्ये झालेल्या गोळीबारावर कपिल शर्माची प्रतिक्रिया, "मुंबई पोलिसांपेक्षा कोणीही चांगले नाही"