देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि दक्षिण काशी म्हणून समजले जाते. श्री कुणकेश्वर मंदिराचे वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम आणि किनार्यावरील या मंदिराचे स्थान यामुळे या मंदिराच्या देखणेपणात भर पडली आहे. हे मंदिर अकराव्या शतकात बांधले गेले असावे, असे सांगितले जाते. या मंदिराचे संपूर्ण बांधकाम अत्यंत कलात्मक आहे.
या मंदिराविषयी एक दंतकथा सांगितली जाते. फार पूर्वी एक अरबी व्यापारी आपले गलबत घेऊन कोकण किनार्या वरुन जात होता. सारे काही सुरळीत आहे असे वाटत असताना अचानक मोठे वादळ सुरु झाले. पाहता पाहता काही दिसेनासे झाले. या वादळात त्याचे गलबत कोठे भरकटले ते समजण्यास मार्ग नव्हता. या भरकटलेल्या जहाजाला थांबविण्यासाठी कोठे किनारा दिसतो का याचा तो व्यापारी शोध घेऊ लागला. याच वेळी त्या प्रचंड वादळात त्याला लांबवर एक लुकलुकणारा दिवा दिसला. त्या दिव्याच्या दिशेने त्याने आपले गलबत महत्प्रयासाने हाकारले. घोंघावणार्या् वादळातही न विझता त्या व्यापार्याला सुखरुप किनार्याघवर आणणारा तो दिवा म्हणजे शंकराच्या छोट्याशा मंदिरातीलपणती होती. यामुळे कृतज्ञतेपोटी त्या व्यापार्याचने यानंतर या ठिकाणी मंदिराची उभारणी केली. मंदिराच्या बाजूलाच एक कबरही हे.
हिंदू- मुस्लीम ऐक्याचा हा एक आदर्श नमुना आहे. कुणकेश्वराचे मंदिर कोकणात दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. येथील शंकराची पिंड भव्यदिव्य असून, ती निसर्गनिर्मित आहे असे सांगितले जाते. श्रावणात दूरवरुन भाविक येथे दर्शनासाठी येतात.