Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाराष्ट्र दर्शन : आदिशक्ती एकविरा आई

महाराष्ट्र दर्शन : आदिशक्ती एकविरा आई
, शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2024 (07:35 IST)
आई एकवीराचे देऊळ महाराष्ट्रातील लोणावळाच्या कार्ल्या लेणी जवळ आहे.आगरी-कोळी समाजाचे बांधव येथे आईच्या पूजेसाठी येतात.हे कुणबी समाजाच्या लोकांची कुलदैवत देखील आहे. या मंदिरामध्ये एकसारख्या बांधणीची एका ओळीत बांधलेली मूळच तीन मंदिरे पश्चिममुखी आहे.अश्विन नवरात्र किंवा शारदीय नवरात्रात येथे भाविकांची गर्दी ओसंडून येते. येथे पशुबळी देण्याची प्रथा देखील आहे. हे देवस्थान जागृत आहे. ही देवी चमत्कारिक आहे.ही देवी आई नवसाला पावणारी आहे.
हे मंदिर पांडवकाळातील आहे.त्यांनी आपल्या वनवासाच्या काळात हे बांधले होते.अशी आख्यायिका आहे की पांडवांच्या वनवासाच्या काळात आई एकवीरेने त्यांना दृष्टांत देऊन मंदिर बांधण्याची आज्ञा दिली.आणि देऊळ एका रात्रीच बनवायची अशी अट घातली.पांडवांनी आईची अट मान्यकरून एकाच रात्रीत  हे देऊळ बांधले.त्यांची भक्ती पाहून देवी आई त्यांच्यावर प्रसन्न झाली आणि त्यांना अज्ञातवासात कोणीही ओळखू शकणार नाही असे वर दिले.एकविरा देवी आई ही रेणुका मातेचा अवतार असल्याचे म्हटले जाते.
 
सदर मंदिर डोंगऱ्यावर असून तेथे जाण्यासाठी बऱ्याच पायऱ्या चढाव्या लागतात.हे मंदिर पुरातत्व विभागाद्वारे  संरक्षित असलेल्या कार्ल्याच्या लेण्यांनी वेढलेले आहे.मुख्य देऊळ आई एकवीरेचे असून तिच्या डावीकडे आई जोगेश्वरी आहे.
 
कसे यायचे-
हे मंदिर लोणावळ्यापासून 8 किमीच्या अंतरावर आहे.लोणावळ्यापासून आई एकविरेच्या मंदिरात जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसेसने जाऊ शकतो.
लोणावळातून आटो रिक्षाने देखील जाता येतं. सेंट्रल पॉईंट लोणावळा (शिवनेरी बस स्टॉप) पासून 5 किमी. पुणे शहर (महाराष्ट्र) पासून 49 कि.मी. मुंबईपासून 97 कि.मी अंतरावर आहे. पुणे लोणावळा मार्गावर लोणावळ्याच्या अलीकडील मळवली रेल्वे स्टेशनपासून हे मंदिर पायी चालायच्या अंतरावर आहे. पुणे ते लोणावळा अशी लोकल रेल्वेची सेवा आहे.
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'द ग्रेट इंडियन कपिल शो' वादात अडकला,कायदेशीर नोटीस मिळाली