suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Konkan Tourism निसर्गसौंदर्याने नटलेला प्रदेश कोकण; परिसरातील प्रमुख निसर्गस्थळे

kasheli-sea-beach-konkan
Maharashtra Tourism : महाराष्ट्राच्या किनारपट्टीचा भाग कोकण रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हे हा निसर्गसौंदर्याने नटलेला प्रदेश आहे. येथे स्वच्छ समुद्रकिनारे, धबधबे, हिरवेगार डोंगर, जंगले आणि शांत वातावरण आहे. पावसाळ्यात कोकण जणू हिरवा शालू परिधान करतो. आज आपण कोकण परिसरातील प्रमुख निसर्गस्थळे पाहणार आहोत.

कोकण परिसरातील प्रमुख निसर्गस्थळे
सर्वोत्तम समुद्रकिनारे  
गणपतीपुळे- गणपतीपुळे येथील पांढरी वाळू, स्वयंभू गणपती मंदिर आणि शांत किनारा पाहण्यासारखा असून कुटुंबासाठी ट्रिप करणे उत्तम.
तारकर्ली -क्रिस्टल क्लिअर पाणी, स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग आणि मँगलोव्ह फॉरेस्ट. कोकणातील सर्वात प्रसिद्ध.
दिवेआगर- शांत, स्वच्छ आणि कमी गर्दीचा किनारा. सुवर्ण गणेश मंदिर जवळ.
अंजर्ले आणि कार्डे - दापोलीजवळ, हिरवीगार झाडी आणि समुद्र एकत्र.
काशिद- अलिबागजवळ, पाम ट्रीज आणि निळे पाणी.
मुरुड- लांब किनारा आणि जनजिरा किल्ल्याजवळ.
देवबाग- मालवणजवळ, शांत आणि सुंदर.

webdunia
प्रसिद्ध धबधबे
अंबोली- कोकणातील एकमेव हिल स्टेशन. अनेक धबधबे, रेनफॉरेस्ट आणि रिव्हर्स वॉटरफॉल .
सावत्साडा आणि सावद- चिपळूणजवळ, पावसाळ्यात भव्य.
मार्लेश्वर- शिवमंदिरासह धबधबा.
निवली रणपट आणि चुना कोळवण- रत्नागिरी परिसरात.

इतर निसर्गरम्य ठिकाणे
दापोली-"मिनी महाबळेश्वर" म्हणून ओळख, बीचेस, डोल्फिन स्पॉटिंग आणि हिल स्टेशन वातावरण.
वेलास-ऑलिव्ह रिडले कासवांचे संरक्षण, टर्टल फेस्टिव्हल  
अंबोली घाट- जंगले, पक्षी आणि शांतता.
हरिहरेश्वर- समुद्रकिनारा आणि मंदिर, ट्रेकिंगसाठी चांगले.
कुणकेश्वर- समुद्रकिनाऱ्यावरील प्राचीन शिवमंदिर.
ALSO READ: Kasheli Beach कोकणातील ऑफबीट व्हिलेज टुरिझम: कशेळी गाव
सर्वोत्तम भेट देण्याची वेळ
मे-जून (पावसाळ्यापूर्वी) किंवा सप्टेंबर-फेब्रुवारी. पावसाळ्यात धबधबे आणि हिरवेगार निसर्ग भन्नाट असतो, पण रस्ते आणि प्रवास जपून करा.
ALSO READ: गर्दीपासून दूर कुठेतरी जायचंय? कोकणातील 'ही' समुद्रकिनारे अजूनही पर्यटकांच्या नजरेपासून दूर आहे
कोकण रोड ट्रिपसाठी मुंबई-गोवा हायवेवरून किंवा पुणे-रत्नागिरी मार्गे जा. लोकल सीफूड, आंबे (हापूस) आणि कोकणी खाण्याचा आनंद घ्या.
ALSO READ: कोकणातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र जागृत परशुराम मंदिर चिपळूण

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अभिनेत्री मौनी रॉयचा संसार मोडला