Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 19 February 2025
webdunia

शनिवार वाडा पुणे

Shaniwar Wada
, बुधवार, 29 जानेवारी 2025 (07:30 IST)
Maharashtra Tourism : महाराष्ट्राला अनेक प्राचीन ऐतिहासिक वास्तूंचा वारसा लाभलेला आहे. याच प्राचीन वास्तूंपैकी एक वास्तू म्हणजे शनिवार वाडा होय. शनिवार वाडा हा पुण्यातील एक प्रसिद्ध राजवाडा आहे जो 1732 मध्ये बांधला गेला होता, जो पेशव्यांच्या राजवटीच्या काळातील वैभवाचे प्रतिबिंबित आहे. तसेच शनिवार वाडा हा स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. बाजीरावांनी मराठा शासक छत्रपती शाहू यांचे पेशवे किंवा पंतप्रधान म्हणून काम केले. जेव्हा किल्ल्याचा वाडा बांधला गेला तेव्हा तो शहराच्या जवळजवळ संपूर्ण क्षेत्रावर व्यापला होता. शनिवार वाडा, पेशव्यांच्या भव्यतेचा, शौर्याचा आणि न्याय्य राजवटीचा शेवटचा पुरावा देखील सादर करतो. तुम्ही जर पुणे जात असाल तर या भव्य शनिवार वाड्याला नक्की भेट द्या. तसेच अनेक पर्यटक दररोज शनिवार वाड्याला भेट देत असतात.

webdunia
शनिवार वाड्याचा इतिहास-
शनिवार वाडा हा 18 व्या शतकात मराठा शासक छत्रपती शाहू यांचे पेशवे पंतप्रधान म्हणून काम करणाऱ्या बाजीराव प्रथम यांनी बांधला होता. तसेच असे मानले जाते की राजवाड्याचे बांधकाम सुरुवातीला दगडापासून सुरू झाले होते. पण काही लोकांनी याला विरोध केला आणि असा युक्तिवाद केला की दगडापासून बनवलेला महाल फक्त राजाकडेच असू शकतो. म्हणून शनिवार वाड्याचे बांधकाम विटांनी सुरू झाले. मराठा शाही वास्तुकलेचे मुघल वास्तुकलेचे उत्कृष्ट मिश्रण दाखवणारी ही सुंदर रचना पूर्ण करण्यासाठी दोन वर्षे लागली. पण इंग्रजांनी शनिवार वाड्यावर हल्ला केला, ज्यामुळे सर्व वरचे मजले पाडण्यात आले होते. तसेच शनिवार वाड्याची पायाभरणी पेशवे बाजीराव प्रथम यांनी 1730 रोजी केली. शनिवार वाडा हे मराठा शैलीतील बांधकाम आणि मुघल स्थापत्यकलेचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. मुख्य दरवाजा, ज्याला दिल्ली दरवाजा म्हणूनही ओळखले जाते, तो शत्रूच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी लोखंडी काट्यांनी सजवलेला आहे कारण तो हत्ती त्यातून जाऊ शकेल इतका मोठा आहे.
या दरवाजाशिवाय, वाड्याला आणखी चार दरवाजे आहे, ते म्हणजे मस्तानी दरवाजा, खिडकी दरवाजा, गणेश दरवाजा आणि नारायण दरवाजा. तसेच भिंतींवर फुलांचे कोरीवकाम आणि चित्रे आहेत जी मुघल स्थापत्य शैलीशी मिळतीजुळती आहे.रामायण आणि महाभारतातील दृश्ये देखील विविध महत्त्वाच्या ठिकाणी चित्रित केलेली आढळतात. खिडक्या आणि दरवाजे देखील घुमटाच्या आकाराचे आहे जे मुघल स्थापत्यकलेचे चिन्ह दर्शवितात.  
ALSO READ: जगप्रसिद्ध अजिंठा लेणी औरंगाबाद
शनिवार वाड्याची हॉन्टेड स्टोरी-
पुण्यातील प्रसिद्ध शनिवारवाडा किल्ला केवळ त्याच्या विशाल वास्तुकलेमुळेच नाही तर येथे घडणाऱ्या अनेक रहस्यमयी घटनांमुळेही देखील चर्चेत आहे. जो भारतातील सर्वात हॉरर किल्ल्यांपैकी एक म्हणूनही ओळखला जातो. असे म्हटले जाते की पौर्णिमेच्या रात्री येथे खूप अलौकिक क्रियाकलाप असतात. या रहस्यमयी भुताटकीच्या घटनांमागील कथा सांगण्यात येते की, एका राजकुमाराची नारायणरावांची  निर्घृण हत्या करण्यात आली होती, त्यानंतर त्यांचा आत्मा येथे भटकतो. असे सांगण्यात येते की, रात्री किल्ल्यातून ''काका मला वाचावा काका मला वाचावा'' असे ओरडण्याचे आवाज देखील ऐकू येतात. तसेच हा आवाज त्याच राजकुमाराच्या आहे अशी येथील हॉन्टेड स्टोरी आहे. तसेच संध्याकाळ नंतर हा वाडा बंद करण्यात येतो म्हणजेच संध्याकाळ नंतर पर्यटकांना तिथे थांबण्याची परवानगी नाही कारण असे सांगतात की, अजूनही राजकुमार नारायणरावांच्या आत्मा शनिवार वाड्यात भटकतो. असा हा अद्भुत रहस्यमयी शनिवार वाड्याला अनेक पर्यटक भेट देतात.  

शनिवार वाडा पुणे जावे कसे?
विमान मार्ग- पुणे हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर आहे. पुणे विमानतळ हे शनिवारवाड्याचे सर्वात जवळचे विमानतळ आहे जे देशातील स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय विमान सेवांशी जोडलेले आहे.विमानतळावर पोहोचल्यानंतर टॅक्सी, कॅब किंवा इतर स्थानिक वाहतुकीच्या साधनांनी शनिवार वाड्यापर्यंत नक्कीच पोहचू शकतात.

रेल्वे मार्ग- पुणे हे देशातील अनेक प्रमुख शहरांशी रेल्वे मार्गाने चांगले जोडलेले आहे. भारतातील सर्व प्रमुख शहरांमधून पुण्याला जाण्यासाठी सहज गाड्या मिळतात. रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर तुम्ही कॅब किंवा रिक्षाच्या मदतीने शनिवार वाड्यापर्यंत सहज पोहचू शकतात.

रस्ता मार्ग-परिवहन व्यतिरिक्त, पुण्याहून खाजगी बसेस देखील दैनंदिन सेवा देतात. बस व्यतिरिक्त,वैयक्तिक वाहन किंवा टॅक्सीच्या मदतीने वाड्यापर्यंत सहज पोहचू शकतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राजस्थानमधील या चमत्कारिक तलावात स्नान केल्याने संतती प्राप्त होते, येथे असते भाविकांची गर्दी