Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

श्री काळभैरवनाथ देवस्थान खामुंडी

kalbheraw
, गुरूवार, 19 जून 2025 (07:30 IST)
Maharashtra Tourism : महाराष्ट्राला अनेक कुलदैवत लाभले आहे. तसेच महाराष्ट्र ही पवित्र भूमी म्हणून ओळखली जाते. संत महात्मे, देवी देवता यांचे अनेक मंदिरे या महाराष्ट्र भूमीमध्ये स्थापित आहे. अनेक प्राचीन मंदिरे इतिहासाची साक्ष देत भक्कमपणे उभे आहे. या सर्व मंदिरांपैकी एक प्राचीन मंदिर म्हणजे श्री काळभैरवनाथ मंदिर होय. तुम्ही या मंदिराला नक्कीच भेट देऊन श्री काळभैरवनाथ यांचे आशीर्वाद प्राप्त करू शकतात. 
 
श्री काळभैरवनाथ मंदिर हे महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात श्री क्षेत्र खामुंडी येथे आहे. तसेच श्री काळभैरवनाथ हे येथील ग्रामदैवत असून हे तीर्थक्षेत्र सह्याद्री डोंगराच्या पायथ्याशी वसलेले आहे. तसेच येथील भाविकांची श्री काळभैरवनाथ यांच्यावर खूप श्रद्धा आहे.  
 
श्री काळभैरवनाथ मंदिर इतिहास  
श्री काळभैरवनाथ मंदिराचा इतिहास कमीतकमी ३५० वर्षापूर्वीचा आहे म्हणजे असे सांगण्यात येते की हे मंदीर ३५० वर्षे प्राचीन आहे. तसेच या मंदिरावर सोन्याचा सुंदर असा कळस आहे जो ग्रामस्थांनी देणगी गोळा करून स्थापित केला. असे सांगण्यात येते की खोदकाम करत असताना श्री काळभैरवनाथांची मुर्ती सापडली होती. ही मुर्ती ज्याठिकाणी सापडली ग्रामस्थांनी त्याचठिकाणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून मंदीर उभारले त्यानंतर सरदार घोरपडे यांनी या मंदिराचा जिर्णोधार केला व सुंदर असे भव्य मंदीर बांधले त्यानंतर अनेक काळ लोटला व ग्रामस्थांनी मंदिरामध्ये सुधारणा करून एक भव्य मंदिर बांधले. श्री काळभैरवनाथांच्या आशीर्वादाने भाविक दुःखमुक्त होऊ लागले  
श्री काळभैरवनाथ मंदीर हे पंचक्रोशीतील भाविकांचे कुलदैवत असून स्वयंभू आहे. श्री काळभैरवनाथ हे नवसाला पावणारे देवता म्हणून येथे प्रचलित आहे. तसेच श्री क्षेत्र खामुंडी येथील श्री काळभैरवनाथांच्या अवताराची कथा ही काशीखंड या पौराणिक ग्रंथामध्ये वर्णन केली असून आज श्री काळभैरवनाथ महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. 
 
श्री काळभैरवनाथ यात्रा
श्री क्षेत्र खामुंडी येथील श्री काळभैरवनाथांच्या उत्सवामध्ये पंचक्रोशीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक दर्शनासाठी येतात व भक्तिभावाने सेवा करतात. श्री काळभैरवनाथ हे अतिशय जागृत देवस्थान आहे अनेक भाविक श्री काळभैरवनाथांना नवस बोलून आपल्या समस्यांचे समाधान मिळवता तसेच नवस पूर्ण झाल्यानंतर अगदी मनोभावे नवस देखील पूर्ण करतात  क्षेत्र खामुंडी येथील श्री काळभैरवनाथ हे भक्तांच्या हाकेला धावून येतात 
श्री काळभैरवनाथ मंदिर खामुंडी जावे कसे?
श्री काळभैरवनाथ मंदिर खामुंडी हे गाव नगर-कल्याण महामार्गावर असून गावात जाण्यासाठी अनेक वाहन उपलब्ध आहे. तसेच पुणे व जुन्नर वरून खामुंडी येथे जाण्यासाठी बसेस देखील उपलब्ध आहे. 
ALSO READ: संत निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिर, त्र्यंबकेश्वर

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Mithi River Scam अभिनेता डिनो मोरियाची पुन्हा चौकशी होणार, ईडीने समन्स पाठवले