Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उन्हाळ्याच्या सुट्टीत थंडावा हवाय? महाराष्ट्रातील 'ही' ५ थंड हवेची ठिकाणे तुमची सुट्टी खास बनवतील

Summer Special
, शनिवार, 31 जानेवारी 2026 (07:30 IST)
Maharashtra Tourism : उन्हाळ्याचा तडाखा वाढला की, मनाला ओढ लागते ती थंडगार वाऱ्याची आणि हिरवळीची. महाराष्ट्रात अशी काही रत्ने दडलेली आहे, जिथे गेल्यावर तुम्हाला उन्हाळ्याचा विसर पडेल. उन्हाळी सुट्टी अविस्मरणीय करण्यासाठी महाराष्ट्रातील ५ सर्वोत्तम थंड हवेची ठिकाणे नक्कीच एक्सप्लोर करा.
महाबळेश्वर सातारा  
महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय ठिकाण. येथील आल्हाददायक वातावरण आणि निसर्गसौंदर्य मनाला उभारी देते. येथील विशाल पठार आणि खोल दऱ्या पाहण्यासारख्या असतात. इथली धुके भरलेली सकाळ आणि सनसेट पॉईंट्स तसेच पाहण्यासारखे आहे. 
विशेष आकर्षण: वेण्णा लेक, ऑर्थर सीट पॉईंट, मॅप्रो गार्डन आणि ताज्या स्ट्रॉबेरीचा आनंद.
ALSO READ: The Italy of India महाराष्ट्रातील या हिल स्टेशनला भारताचे इटली म्हटले जाते
लोणावळा-खंडाळा पुणे 
लोणावळा-खंडाळा सह्याद्रीच्या कुशीत वसलेली ही जोड-शहरे पर्यटकांची पहिली पसंती असतात.
विशेष आकर्षण: राजमाची पॉईंट, टायगर पॉईंट, भुशी डॅम आणि कार्ला-भाजे लेणी.
 
चिखलदरा अमरावती 
चिखलदरा हे विदर्भातील कडक उन्हात थंडावा देणारे हे एकमेव ठिकाण आहे. सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत हे वसलेले आहे.
विशेष आकर्षण: गाविलगड किल्ला, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, भीमकुंड आणि पंचबोल पॉईंट.
 
माथेरान रायगड  
माथेरान रायगड  हे आशियातील एकमेव 'ऑटोमोबाईल फ्री' थंड हवेचे ठिकाण असून येथे गाड्यांना प्रवेश नसल्याने हवा अतिशय शुद्ध आणि थंड असते.
विशेष आकर्षण: टॉय ट्रेनची सफर, पॅनोरमा पॉईंट, इको पॉईंट आणि घोडदौड.
 
पाचगणी सातारा 
महाबळेश्वरच्या अगदी जवळ असलेले हे ठिकाण शिक्षणाचे माहेरघर आणि निसर्गरम्य दृश्यांसाठी ओळखले जाते. तसेच पॅराग्लायडिंगसाठी हे महाराष्ट्रातील उत्तम ठिकाण आहे.
प्रमुख आकर्षणे: टेबल लँड (आशियातील दुसरे सर्वात मोठे पठार), पारसी पॉईंट आणि सिडनी पॉईंट.
ALSO READ: महाराष्ट्रातील ५ रहस्यमय किल्ले आणि ठिकाणे

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Mardaani 3 Review 'मदानी ३' पाहण्यापूर्वी हा रिव्ह्यू नक्की वाचा; धाडसी शिवानी रॉयची सर्वात कमकुवत लढाई?